वासनांध बाबाचे बिंग फुटले
By admin | Published: May 25, 2016 04:13 AM2016-05-25T04:13:20+5:302016-05-25T04:13:20+5:30
काली माँ आश्रमाचा संचालक रामशंकर तिवारी उर्फ परमानंद महाराज याला लैंगिक शोषणाच्या आरोपात पोलिसांनी मंगळवारी अटक केली. हा स्वयंघोषित बाबा अपत्यहीन महिलांना आपल्या
बाराबंकी : काली माँ आश्रमाचा संचालक रामशंकर तिवारी उर्फ परमानंद महाराज याला लैंगिक शोषणाच्या आरोपात पोलिसांनी मंगळवारी अटक केली. हा स्वयंघोषित बाबा अपत्यहीन महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण आणि व्हिडीओ चित्रीकरण करायचा.
‘शक्तीबाबा’ म्हणूनही परिचित असलेल्या तिवारीने हराई गावात २५ वर्षांपासून आपला आश्रम थाटला होता.
तो अपत्यहीन महिलांना पुत्रप्राप्तीचे आमिष दाखवायचा आणि त्यांना पूजापाठाच्या नावावर आश्रमात बोलवायचा व तेथे त्यांच्यावर बलात्कार करायचा. या बलात्काराची तो व्हिडीओ फिल्मही तयार करीत असे व कुणाला काही सांगितल्यास व्हिडीओ सार्वजनिक करण्याची धमकी महिलांना देत असे, असे पोलीस अधीक्षक अब्दुल हमिद यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
संगणक दुरुस्तीला दिला अन् झाला पर्दाफाश...
महिलांवर बलात्कार करतानाचा व्हिडीओ तो आपल्या संगणकात सेव्ह करून ठेवत असे. त्याचा संगणक बिघडल्याने त्याने तो एका इंजिनीअरकडे दुरुस्तीसाठी दिला.
संगणक दुरुस्त करीत असताना इंजिनीअरला हे सर्व अश्लील व्हिडीओ दिसले. त्याने तिवारीचा पर्दाफाश करण्याचे ठरवून हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले.
त्यानंतर काही महिलांनी पुढे येऊन पोलिसांत तक्रार केली. त्याच्याविरुद्ध देवा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली.