पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनेला प्रशासनाचा खो!
By admin | Published: March 23, 2017 05:19 PM2017-03-23T17:19:28+5:302017-03-23T17:19:28+5:30
बबन इंगळे * सायखेड : माहे सप्टेंबर २०१६ पासून टिकून राहिलेले विहिरी व जातांपाची पाणी पातळी खालावत असल्याने बार्शीटाकळी तालुक्यात ग्रामीण भागात पाणीटंचाई जाणवत असल्याचे चित्र दिसून येत आहे. रब्बीची गहु, हरभरा व इतर पिके फुलोरा अवस्थेत असतानाच विहिरीतील पाणी पातळी खालावल्याने काही पिके परिपक्व होण्यापूर्वीच सुकून गेली. परिणामी पीक उत्पादनात घट होऊन सिंचनाचे स्रोत बंद झाले. पाणीटंचाई निवारण्यासाठी शासनाने विविध उपाययोजनांचा कृती आराखडा जाहीर केला. परंतु पं. स. स्तरावर त्याचे अद्यापही नियोजन न झाल्याने पिण्याची पाणीटंचाई जाणवत आहे. कृती आराखड्यानुसार १९ प्रस्तावित उपायोजनेसाठी २९.३० लाख रुपये तर ३० प्रस्तावित उपायोजनेसाठी ४२.९० लाख रुपयाच्या खर्चाची तरतूद आहे. या उपाययोजना जानेवारी ते मार्च २७१७ व एप्रिल ते जून २०१७ च्या कालावधीत
Next
ब न इंगळे * सायखेड : माहे सप्टेंबर २०१६ पासून टिकून राहिलेले विहिरी व जातांपाची पाणी पातळी खालावत असल्याने बार्शीटाकळी तालुक्यात ग्रामीण भागात पाणीटंचाई जाणवत असल्याचे चित्र दिसून येत आहे. रब्बीची गहु, हरभरा व इतर पिके फुलोरा अवस्थेत असतानाच विहिरीतील पाणी पातळी खालावल्याने काही पिके परिपक्व होण्यापूर्वीच सुकून गेली. परिणामी पीक उत्पादनात घट होऊन सिंचनाचे स्रोत बंद झाले. पाणीटंचाई निवारण्यासाठी शासनाने विविध उपाययोजनांचा कृती आराखडा जाहीर केला. परंतु पं. स. स्तरावर त्याचे अद्यापही नियोजन न झाल्याने पिण्याची पाणीटंचाई जाणवत आहे. कृती आराखड्यानुसार १९ प्रस्तावित उपायोजनेसाठी २९.३० लाख रुपये तर ३० प्रस्तावित उपायोजनेसाठी ४२.९० लाख रुपयाच्या खर्चाची तरतूद आहे. या उपाययोजना जानेवारी ते मार्च २७१७ व एप्रिल ते जून २०१७ च्या कालावधीत करण्यात येणार आहे.कृती आराखड्यातील गावेसुकळी, वरखेड, सराव कासारखेड, चिंचखेड, आळंदा, मोर्हाळ, गोरव्हा, कातखेड, पार्डी, मोझरी, उजळेश्वर, चेलका, पाराभवानी, सालपी, वाल्पी, टेंभी, पिंपळगाव (हांडे), पारधोपाडा (टिटवा), टिटवा हलदोली, जांभरूण, वस्तापूर (नवीन वस्ती), कासमार, वाघा, पुनोती बु., अजनी बु., पिंपळखुटाप्रस्तावित उपाययोजनाविहिरी खोदकाम, गाळ काढणे, विहीर अधिग्रहण, टँकर, बैलगाडीने पाणीपुरवठा, नळयोजना विशेष दुरुस्ती विंधन विहीर दुरुस्ती, विद्युत पंप, हातपंप दुरुस्ती, नवीन विंधन विहीरजलयुक्त शिवार योजनेतील गावे टंचाईच्या यादीतबार्शीटाकळी तालुक्यात मागील वर्षी १८ व चालु वर्षात २८ गावे जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट आहेत.यांपैकी काही गावे ही पाणीटंचाई कृती आराखड्याच्या यादीत असल्याने या ठिकाणीयोजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी झालीनसल्याचे यावरून दिसून येते.पाणीटंचाई सदृश स्थिती असलेली गावेसाखरविरा, जामवसू, मांडोली, चोहोगाव, सायखेड, पुनोती, कोथळी, मांगुळ, खडकी, जामनाईक, राजनखेड, निंबी, चेलका.हातपंप दुरुस्तीचे २३ लाख थकितबार्शीटाकळी तालुक्यात गेल्या तीन ते चार वर्षापासून ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नादुरुस्त हातपंप दुरुस्त केले. अशा सर्व ग्रामपंचायतीकडे हातपंप दुरुस्तीचे २३ लाख रुपये थकित असल्याची माहिती पं. स. कडून प्राप्त झाली आहे. सध्या ताुलक्यातील अनेक भागात असलेल्या हातपंपाच्यापाणी पातळीत घट झाल्याने दुरस्त करणारी यंत्रणा काम पाहत असली तरी या थकित रकमेमुळे हातपंप दुरुस्त करणारी यंत्रणासुद्धा आपलाहात आखुड करीत असल्याचे दिसून येते.