China Army: लडाखमध्ये चिनी सैनिकांचे पाय लडखडले; 90 टक्के सैन्य माघारी परतले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 02:15 PM2021-06-06T14:15:24+5:302021-06-06T14:15:53+5:30
china Army on LAC: चीनने गेल्या वर्षभरापासून तैनात असलेल्या सैनिकांना बदलण्यासाठी अन्य ठिकाणच्या सैनिकांना आणले आहे. जवळपास 90 टक्के सैनिक माघारी घेतले असून नवे सैनिक तैनात केले आहेत.
पूर्व लडाखमध्ये (Ladakh) भारतीय सीमेवर (LAC) चिनी सैनिकांची पुरती वाट लागली आहे. रक्त गोठवणाऱ्या थंडीने चिनी सैनिकांचे (china Army in Ladakh) पाय लडखडू लागले आहे. या थंडीने प्रकृती बिघडल्यामुळे पिपल्स लिबरेशन आर्मीने एलएसीवर तैनात 90 टक्के सैनिकांना माघारी बोलावले आहे. गेल्या वर्षी एप्रिल, मे नंतरच्या तणावामुळे चीनने भारतीय सीमा क्षेत्रात 50000 हून अधिक सैनिक तैनात केले होते. (China rotates 90 per cent troops deployed along Ladakh sector on India border)
चीनने गेल्या वर्षभरापासून तैनात असलेल्या सैनिकांना बदलण्यासाठी अन्य ठिकाणच्या सैनिकांना आणले आहे. जवळपास 90 टक्के सैनिक माघारी घेतले असून नवे सैनिक तैनात केले आहेत. त्यांनाही वातवरणाशी जुळवून घेणे जड जात असल्याचे सुत्रांनी एएनआयला सांगितले. उंचीवरील भागात कठीण परिस्थिती आहे. यामुळे चीनचे सैनिक थंडी आणि अन्य कारणांनी खूप त्रस्त झाले आहेत. पेंगाँग झील क्षेत्रात तैनात असताना चीन त्याच्या टेकड्यांवरील सैनिकांना दररोज बदलत होते. यामुळे त्यांच्या हालचाली खूप मंदावल्या होत्या.
दुसरीकडे भारतीय सैन्य़ दोन वर्षांसाठी आपल्या जवानांना लडाखच्या उंच भागांत तैनात करते. तसेच वर्षाला 40 ते 50 टक्के जवानांना रोटेट केले जाते. या परिस्थितीमुळे आयटीबीपीच्या जवानांचा कार्यकाळ कधीकधी दोन वर्षांपेक्षा जास्त होतो. काही महिन्यांपूर्वीच चिनी सैन्याने पेंगाँग झीलवरून माघार घेतली होती. परंतू आजही हे सैनिक त्या आसपासच्या भागात तैनात आहेत. (People's Liberation Army has rotated 90 per cent of its manpower and brought in fresh soldiers from the hinterland.)