लडाख भारताचा अविभाज्य भाग, सीमेवर शांती महत्त्वाची; तिबेटच्या निर्वासित पीएमचा चीनवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 09:30 PM2020-06-02T21:30:50+5:302020-06-02T21:31:10+5:30
तिबेटचे निर्वासित सरकारचे पंतप्रधान लोबसंग सांगेय यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
भारत आणि चीन यांच्यात लडाखमध्ये ताणतणाव सुरू आहे. दोन देशांच्या सैन्यात झालेल्या संघर्षानंतर दोन देशांकडून वास्तविक नियंत्रण रेषेवरील सैनिकांची संख्या वाढविली जात आहे. या सर्वांच्या दरम्यान तिबेटचे आध्यात्मिक गुरू दलाई लामा आणि तिबेटच्या निर्वासित सरकारच्या मौनाबद्दल प्रश्न उपस्थित होत होते. आता तिबेटचे निर्वासित सरकारचे पंतप्रधान लोबसंग सांगेय यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
तिबेटच्या निर्वासित सरकारच्या पंतप्रधानांनी सांगितले की, लडाख हा भारताचा भाग आहे. लडाख, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम हे भारताचे भाग आहेत. त्यांच्या शांततेबद्दल उपस्थित झालेल्या प्रश्नांवर ते म्हणाले की, दलाई लामा गेली 60 वर्षे आंतरराष्ट्रीय मंचात चीनविरुद्ध सतत बोलत आहेत. तिबेटवर चीननं कब्जा केल्यानंतर आम्हीही अडचणीत सापडलो आहोत. चीनने तिबेट ताब्यात घेतल्यानंतरच सीमेवरून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता, असेही ते म्हणाले आहेत.
तिबेटच्या निर्वासित झालेल्या पंतप्रधानांनी सांगितले की, तिबेट ताब्यात घेतल्यानंतर चीन तेथील मानवाधिकारांचे सतत उल्लंघन करीत आहेत. यामुळे आपण धर्मशाळेतच थांबलो आहोत. दलाई लामा यांना भारताचे पाहुणे म्हणून वर्णन करताना ते म्हणाले की, तिबेटला शांततेचे शस्त्र बनवावे, असा त्यांना नेहमीच विश्वास आहे. निर्धारित सीमेचा बचाव केला जावा. भारत कधीही आक्रमक झाला नाही. ज्याचा प्रत्येकाला हक्क आहे तो तो बचाव करीत आहे. पण चीन आक्रमक होत असल्यानं भारताला स्वतःच्या सीमांचा बचाव करण्यावाचून पर्याय नाही.
हेही वाचा
Cyclone Nisarga: संकटाच्या छाताडावरती चाल करून जायचंय, उद्धव ठाकरेंचा जनतेला कानमंत्र
Cyclone Nisarga: उद्यापासून २ दिवस घराबाहेर पडायचं नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगितला निसर्गाचा धोका
ठाकरे कॅबिनेटनं घेतले ६ महत्त्वाचे निर्णय, सर्व नागरिकांना मिळणार महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ