Ladakh Standoff: चीनचे सैन्य २ किमी मागे हटले, लवकरच तणाव निवळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 07:49 AM2020-06-04T07:49:42+5:302020-06-04T07:58:46+5:30

गलवान खोऱ्यातील फोर फिंगर भागात काही दिवसांपासून भारत आणि चिनी सैन्यामध्ये तणाव निर्माण झाला आहे.

Ladakh standoff: Slight retreat by Indian, Chinese troops at Galwan Valley before crucial meet | Ladakh Standoff: चीनचे सैन्य २ किमी मागे हटले, लवकरच तणाव निवळणार

Ladakh Standoff: चीनचे सैन्य २ किमी मागे हटले, लवकरच तणाव निवळणार

Next
ठळक मुद्देआता पुन्हा एकदा दोन्ही देशांच्या लष्करांची चर्चा होणार आहे.6 जून रोजी ही बैठक आयोजित केली आहे.या बैठकीत दोन्ही देशांच्या सैन्याचे लेफ्टनंट जर्नल रँकचे अधिकारी भाग घेतील.

नवी दिल्ली : लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनचे सैन्य सीमेपासून काही अंतरावर मागे हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनचे सैनिक सीमेपासून दोन किलोमीटर मागे हटले आहेत. तर भारतीय लष्कराचे जवान आपल्या जागेपासून एक किलोमीटर मागे हटले आहेत. येथील फिंगर फोर भागात या दोन्ही देशांचे सैन्य गेल्या काही आठवड्यांपासून एकमेकांसमोर उभे आहे. त्यामुळे सीमेवर तणावाची परिस्थिती होती. 

गलवान खोऱ्यातील फोर फिंगर भागात काही दिवसांपासून भारत आणि चिनी सैन्यामध्ये तणाव निर्माण झाला आहे. येथील पँगोंग परिसर सर्वात वादग्रस्त आहे. 6 जून रोजी होणाऱ्या या दोन्ही देशांमधील बैठकीत पँगोंगवर अधिक लक्ष केंद्रित केले जाण्याची शक्यता आहे. चिनी सैन्य अनेक आठवड्यांपासून फिंगर फोर क्षेत्रात आहे, जे भारताच्या नियंत्रणात आहे.

लडाखच्या सीमावर्ती भागात चिनी सैन्य आपले सामर्थ्य दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. भारतीय लष्कराचे जवान देखील त्याच्यासमोर उभे राहिले आहे. दोन्ही बाजूंकडून वाटाघाटीही सुरू आहेत, परंतु अद्याप हा वाद संपलेला नाही. आता पुन्हा एकदा दोन्ही देशांच्या लष्करांची चर्चा होणार आहे. 6 जून रोजी ही बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत दोन्ही देशांच्या सैन्याचे लेफ्टनंट जर्नल रँकचे अधिकारी भाग घेतील. 

भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या संदर्भात ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे. या बैठकीचे नेतृत्व भारतातील लेह येथील 14 कोर्सेस कमांडर्सचे प्रतिनिधीमंडळ करणार आहेत. सीमेवरील संकट संपवण्यासाठी ही उच्चस्तरीय बैठक अतिशय महत्त्वाची मानली जात आहे.

पूर्व लडाखमध्ये मे महिन्याच्या सुरूवातीपासूनच हा वाद सुरू आहे. लडाखने एलएसीवर भारताच्यावतीने रस्ता बांधकाम करण्याचे काम करत होते. त्याला चीनने विरोध केला. यानंतर 5 मे रोजी पँगोंग तलावावर दोन्ही देशांचे सैनिक आपापसात भिडले. या चकमकीत काही सैनिकही जखमी झाले. यानंतर चीनने या भागात आपल्या सैनिकांची तुकडी वाढविली. तसेच, चीनने सैन्य तैनात करण्याबरोबरच त्यांनी तंबूही बांधले. भारतीय लष्कराच्या जवानांनी एलएसीवरील चीनच्या या कारवाईला चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय जवानही एलएसी सीमेवर तैनात राहिले.
 

Read in English

Web Title: Ladakh standoff: Slight retreat by Indian, Chinese troops at Galwan Valley before crucial meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.