Video - तुफान राडा! सीटसाठी 2 महिला बसमध्ये भिडल्या, एकमेकींच्या जीवावर उठल्या अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 12:15 PM2023-04-16T12:15:19+5:302023-04-16T12:17:49+5:30
सीटवरून प्रवाशांमध्ये तू-तू-मैं-मैं हे अनेकदा सोशल मीडियावर पाहायला मिळतात, ज्याचे व्हिडीओ तुफान व्हायरल होतात, जे पाहून युजर्सही खूप एन्जॉय करतात.
अनेकदा प्रवासादरम्यान सीटवरून प्रवाशांमध्ये वाद होतात. लांबचा प्रवास करणार्या प्रवाशाला पुढच्या प्रवासासाठी जागा मिळत नाही आणि तो वाटेल ते करू लागतो, तेव्हा भांडण होण्याची शक्यता असते. सीटवरून प्रवाशांमध्ये तू-तू-मैं-मैं हे अनेकदा सोशल मीडियावर पाहायला मिळतात, ज्याचे व्हिडीओ तुफान व्हायरल होतात, जे पाहून युजर्सही खूप एन्जॉय करतात. नुकताच असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ दिल्लीच्या डीटीसी बसचा आहे, ज्यामध्ये सीटसाठी दोन महिलांमध्ये जोरदार भांडण सुरू आहे. उपस्थित प्रवासी भांडण शांत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहेत, परंतु भांडण कमी होण्याऐवजी वाढतच जाते. वास्तविक, व्हिडिओमध्ये लेडीज सीटवरून भांडण होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, लेडीज सीटवर एक पुरुष बसला आहे, त्याला एका महिलेने उठण्यास सांगितले, त्यानंतर दुसरी महिला आणि त्याच्या शेजारी बसलेल्या महिलेमधील भांडण वाढले. शेवटी त्या व्यक्तीला उठावे लागते आणि प्रकरण मिटते.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर हा व्हिडीओ सुमिती चौधरी नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून तो खूप पाहिला आणि शेअर केला जात आहे. एक दिवसापूर्वी शेअर केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत 1 लाख वेळा पाहिला गेला आहे, तर 10 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. 3 मिनिटे 59 सेकंदांच्या या व्हिडिओवर आतापर्यंत 3 हजारांहून अधिक लोकांनी विविध कमेंट्स केल्या आहेत.
व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'आज मी दिल्लीच्या DTC बसमध्ये 2 महिलांना भांडताना पाहिले, त्या दोघी सीटसाठी लढत होत्या, हा फ्री तिकिटाचा परिणाम आहे. तुम्ही व्हिडिओ बघा आणि काही चूक असेल तर सांगा!' एका यूजरने लिहिले की, 'येथे लोकांना फ्री तिकीट आणि सीटही हवी आहेत.' आणखी एका युजरने लिहिले की, 'येथे सर्व दोष त्या पुरुषाचा आहे जो लेडीज सीटवर बसला आहे.' एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"