'लखीमपूरची घटना केवळ अपघात, गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा मागणे अन्यायपूर्वक'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 01:54 PM2021-12-21T13:54:03+5:302021-12-21T13:54:57+5:30

शेतकऱ्यांनी या घटनेनंतर दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आशिष मिश्राचे नाव आहे. यासंदर्भात नेमण्यात आलेल्या तपास पथकाने हा पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचे म्हटले.

The Lakhimpur incident is just an accident, the Minister of State for Home Affairs does not need to resign, nitin gadkari | 'लखीमपूरची घटना केवळ अपघात, गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा मागणे अन्यायपूर्वक'

'लखीमपूरची घटना केवळ अपघात, गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा मागणे अन्यायपूर्वक'

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकऱ्यांनी या घटनेनंतर दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आशिष मिश्राचे नाव आहे. यासंदर्भात नेमण्यात आलेल्या तपास पथकाने हा पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचे म्हटले.

नवी दिल्ली - देशात गाजलेल्या लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराचा मुद्दा आज संसेदत गाजत आहे. मात्र, यासंदर्भात बोलताना केंद्रीयमंत्रीनितीन गडकरी यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 3 ऑक्टोबर रोजी लखीमपूर खेरी येथे शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या घटनेत चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. आशिष मिश्रा यांच्या एसयूव्हीने शेतकर्‍यांना चिरडले होते, या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्यानंतर हिंसाचार उसळला आणि आणखी चार जणांना आपला जीव गमवावा लागला.

शेतकऱ्यांनी या घटनेनंतर दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आशिष मिश्राचे नाव आहे. यासंदर्भात नेमण्यात आलेल्या तपास पथकाने हा पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचे म्हटले. मात्र, लखीमपूर खेरी येथील घटना केवळ अपघात असल्याचं विधान नितीन गडकरी यांनी केलं आहे. ''लखीमपूर येथील घटना ही जबरदस्ती नसून केवळ अपघात असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलं. हे बघा, ते अन्यापूर्वक आहे, या घटनेची सविस्तरपणे माहिती आली आहे. जाणीवपूर्वक भावनेनं ही घटना घडली नसून हा एक अपघात आहे,'' या घटनेचं कुणीही राजकारण करू नये, असे नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. 

हा तर पूर्वनियोजित कट

लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांवर गाडी चढवणे, हा पूर्वनियोजित कटाचा भाग होता. विशेष तपास पथकाने (SIT) याबबातची माहिती दिली आहे. या प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा मुख्य आरोपी आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस पथकाने आशिष मिश्रा यांच्यावरील आरोपांमध्ये सुधारणा करण्यात यावी, असे पत्र न्यायाधीशांना लिहिले आहे. आशिष मिश्रा आणि इतरांवर यापूर्वीच खून आणि कट रचण्याचे आरोप आहेत. त्यात खुनाचा प्रयत्न आणि इतर आरोपही जोडले जावेत, अशी विशेष तपास पथकाची इच्छा आहे. 

विरोधकांनी संसदेत उठवला आवाज

दरम्यान, सत्ताधारी भाजप यूपीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीत असताना, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्यासाठी लखीमपूर घटनेच्या घडामोडी मोठ्या डोकेदुखी ठरू शकतात. या घटनेनंतर विरोधकांकडून अजय मिश्रा यांना हटवण्याची मागणी सातत्याने होत असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना मंत्रिमंडळात कायम ठेवले आहे. लखीमपूर खेरीच्या घटनेबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून, आज संसदेतही विरोधकांनी मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 
 

Web Title: The Lakhimpur incident is just an accident, the Minister of State for Home Affairs does not need to resign, nitin gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.