हृदयद्रावक! रुग्णवाहिका न मिळाल्याने हतबल मुलांनी बाईकवरून घरी आणला वडिलांचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 04:01 PM2021-08-04T16:01:13+5:302021-08-04T16:08:00+5:30

Uttar Pradesh News : दोन मुलं बाईकवरून वडिलांचा मृतदेह घरी घेऊन येत असल्याचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. 

up lakhimpur kheri ambulance father death body bike sons | हृदयद्रावक! रुग्णवाहिका न मिळाल्याने हतबल मुलांनी बाईकवरून घरी आणला वडिलांचा मृतदेह

हृदयद्रावक! रुग्णवाहिका न मिळाल्याने हतबल मुलांनी बाईकवरून घरी आणला वडिलांचा मृतदेह

googlenewsNext

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरी जिल्ह्यामध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. खूप प्रयत्नांनंतरही रुग्णवाहिका न मिळाल्याने शेवटी हतबल झालेल्या दोन मुलांनी बाईकवरून वडिलांचा मृतदेह घरी आणला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच मुलांनी आपल्या वडिलांच्या मृत्यूसाठी डॉक्टरांचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला आहे. दोन मुलं बाईकवरून वडिलांचा मृतदेह घरी घेऊन येत असल्याचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, खमरिया येथील एका गावात राहणारे 78 वर्षीय व्यक्तीची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्यांच्या दोन्ही मुलांनी सर्वात आधी 108 नंबरवर रुग्णवाहिकेसाठी फोन केला. मात्र खूप वेळ झाला तरी देखील रुग्णवाहिका आलीच नाही. त्यानंतर मुलांनी बाईकवरूनच वडिलांना उपचारासाठी रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे उपचार करण्यास उशीर झाला आणि वडिलांचा मृत्यू झाला असा आरोप मुलांनी केला आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर मृतदेह घेऊन जाण्यासाठी मुलांनी पुन्हा एकदा रुग्णवाहिकेसाठी फोन केला. 

रुग्णवाहिकेची बराच वेळ वाट पाहिली मात्र ती आलीच नाही. त्यामुळे मुलांनी बाईकवरूनच वडिलांचा मृतदेह नेण्याचा निर्णय घेतला. रस्त्यावरून बाईकने मृतदेह घेऊन जात असताना अनेकांनी याचे फोटो काढले. ते फोटो आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमध्ये रुग्णावाहिकेच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. सर्व जिल्ह्यांत पाच हजारांहून अधिक रुग्णवाहिका या उभ्या आहेत. मात्र रुग्णांची यामुळे वणवण होत आहे. तर काहींना यामुळे वेळेत उपचार मिळत नसल्याने आपली जीव गमवावा लागत आहेय. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

कुटुंब म्हणतंय हत्या, पोलीस म्हणताहेत आत्महत्या; 'तिच्या' मृत्यूचं गूढ उकलेना; नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. दीनदयाल उपाध्याय गोरखपूर विश्वविद्यालयातील विभागात एका विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी हत्या झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. तर पोलीस आत्महत्या झाल्याचं म्हणत आहेत. यामुळेच या मृत्यू प्रकरणाचं कोडं अद्याप उलगडलेलं नाही. गोरखपूरचे एसएसपी दिनेश कुमार प्रभू यांनी पोस्टमॉर्टम रिपोर्टचा हवाला देत गळफास घेतल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. मात्र नातेवाईकांनी हत्येची तक्रार दाखल केली आहे. दिनेश कुमार प्रभू यांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 जुलै रोजी विद्यार्थिनीचा मृतदेह आढळून आला आहे. तिने गळफास घेतला होता. मात्र मुलीच्या कुटुंबीयांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे. 

Web Title: up lakhimpur kheri ambulance father death body bike sons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.