Lakhimpur Kheri Updates: शेतकऱ्यांच्या मृत्यूमुळे देशभरात संताप; UP सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना ४५ लाख आणि नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 08:06 AM2021-10-05T08:06:44+5:302021-10-05T08:09:01+5:30

वातावरण शांत करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ४५ लाख, कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरी आणि जखमींना १० लाख रुपये अशी घोषणा केली आहे

Lakhimpur Kheri Farmers: 45 lakh and jobs to the families of the deceased from the UP government | Lakhimpur Kheri Updates: शेतकऱ्यांच्या मृत्यूमुळे देशभरात संताप; UP सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना ४५ लाख आणि नोकरी

Lakhimpur Kheri Updates: शेतकऱ्यांच्या मृत्यूमुळे देशभरात संताप; UP सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना ४५ लाख आणि नोकरी

googlenewsNext
ठळक मुद्देमृतांच्या नातेवाईकांना भेटण्यास  जाऊ पाहणाऱ्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी व सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना पोलिसांनी अटक केलीराज्यात विधानसभेच्या निवडणुका सहा महिन्यांवर असताना हे घडल्याने भाजप नेते हादरले आहेत.केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्र यांना मंत्रिपदावरून हटवावे व त्यांचा मुलगा आशिष मिश्र याला अटक करावी

लखनऊ : लखीमपूर खेरी येथे रविवारी शेतकऱ्यांच्या निदर्शनांवेळी झालेल्या हिंसाचारात आठ जण ठार झाल्यामुळे देशभर संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, सोमवारी सर्वत्र राजकीय पक्ष व शेतकरी संघटनांनी निदर्शने केली. पोलिसांनी केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्र यांच्या मुलाविरुद्धही गुन्हा नोंदविला आहे.

वातावरण शांत करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ४५ लाख, कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरी आणि जखमींना १० लाख रुपये अशी घोषणा केली आहे. झाल्या प्रकाराची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाद्वारे चौकशी केली जाईल. केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांच्या मुलास अटक करावी, अशी मागणी काँग्रेस व शेतकरी संघटनांनी केली आहे. त्यानेच शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घातले, असा आरोप आहे. मृतांच्या नातेवाईकांना भेटण्यास  जाऊ पाहणाऱ्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी व सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना पोलिसांनी अटक केली. राज्यात विधानसभेच्या निवडणुका सहा महिन्यांवर असताना हे घडल्याने भाजप नेते हादरले आहेत. शेतकऱ्यांवर केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाने वाहन घातल्याने चार जण मरण पावले, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. 

प्रियांका गांधींनी पोलिसांना सुनावले
प्रियांका गांधी यांना रविवारी मध्यरात्री लखनऊमध्ये अडवण्यात आले. तेथून त्या पुढे निघाल्यानंतर सीतापूर येथे अडवण्यात आले. मात्र, पोलिसांकडे अटक वॉरंट नव्हते. तिथे महिला पोलीसही नव्हत्या. अशा स्थितीत तुम्ही आपणास अटक करू शकत नाही, असे प्रियंका यांनी पोलिसांना ऐकवले. त्यामुळे नंतर त्यांना वॉरंट व महिला पोलीस यांच्या उपस्थितीत अटक करण्यात आली.

मिश्र यांना मंत्रिपदावरून हटवा : टिकैत
केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्र यांना मंत्रिपदावरून हटवावे व त्यांचा मुलगा आशिष मिश्र याला अटक करावी, अशी मागणी शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केली आहे. माझ्यावरचे आरोप खोटे असून शेतकरी आंदोलन सुरू असलेल्या जागी आपण उपस्थित नव्हतो, असा दावा आशिष मिश्र यांनी केला आहे. 

छावणीचे स्वरूप
लखीमपूरमध्ये प्रचंड पोलीस बंदोबस्त असून, तिथे धडक कृती दलाच्या तुकड्या ठेवण्यात आल्या आहेत. तिथे सध्या शांतता आहे. पण, लखनऊसह उत्तर प्रदेशातील सर्व जिल्हय़ांत आज उग्र निदर्शने झाली. अखिलेश यादव यांना अटक करण्यात आली, तेव्हा तिथे त्यांचे हजारो समर्थक जमले होते. त्यांनी पोलिसांची जीपच जाळली. लखीमपूरला विरोधी नेत्यांना येण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. त्यामुळे उत्तराखंडचे मुख्यमंत्री भूपेश बाघेल व पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी जाऊ शकले नाहीत. 

Web Title: Lakhimpur Kheri Farmers: 45 lakh and jobs to the families of the deceased from the UP government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.