Lakhimpur Kheri Violence: लखीमपूर हिंसाचारातील मुख्य आरोपी असलेला केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा Ashish Mishra आला समोर, म्हणाला, मी तिथे असतो तर जिवंत राहिलो नसतो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 01:35 PM2021-10-05T13:35:32+5:302021-10-05T13:42:41+5:30

Lakhimpur Kheri Violence Update: या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून आरोप होत असलेला केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेणी यांचा मुलगा आशिष मिश्रा आज अखेर प्रसारमाध्यमांसमोर आला.

Lakhimpur Kheri Violence: Ashish Mishra The son of a Union Minister, the main accused in the Lakhimpur violence, came forward and said, "If I were there, I would not have survived." | Lakhimpur Kheri Violence: लखीमपूर हिंसाचारातील मुख्य आरोपी असलेला केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा Ashish Mishra आला समोर, म्हणाला, मी तिथे असतो तर जिवंत राहिलो नसतो

Lakhimpur Kheri Violence: लखीमपूर हिंसाचारातील मुख्य आरोपी असलेला केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा Ashish Mishra आला समोर, म्हणाला, मी तिथे असतो तर जिवंत राहिलो नसतो

Next

लखनौ - लखीमपूर खिरी येथे केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांनी केलेल्या एका वक्तव्याविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाला रविवारी हिंसक वळण लागले. या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह एकूण आठ जणांचा मृत्यू झाला होता. (Lakhimpur Kheri Violence Update) दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून आरोप होत असलेला केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेणी यांचा मुलगा आशिष मिश्रा आज अखेर प्रसारमाध्यमांसमोर आला. यावेळी त्याने आपली बाजू मांडताना आपण घटनास्थळी नसल्याचा दावा केला आहे. तसेच मी तिथे असतो तर आज जिवंत नसतो, असा दावा केला आहे. (Ashish Mishra The son of a Union Minister, the main accused in the Lakhimpur violence, came forward and said, "If I were there, I would not have survived.")

टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीमध्ये लखीमपूर खीरी हिंसाचाराबाबत आशिष मिश्रा याने स्वत:चा बचाव केला आहे. तो म्हणाला की, या प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी व्हावी. मी कुठल्याही प्रकारच्या चौकशीस तयार आहे. ईश्वराचा आशीर्वाद म्हणून सुदैवाने मी तिथे नव्हतो. जर तिथे असतो तर आज मी इथे तुमच्यासमोर नसतो.

लखीमपूरमधील हिंसाचारप्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या मुलावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आपण घटनास्थळी नसल्याचा दावा तो करत आहे. तो म्हणाला की, जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी माझ्या गावात होतो. तिकोनिया येथे गेलो नव्हतो. आमच्या तीन कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करून जिवे मारण्यात आले. तर ड्रायव्हरला जळत्या गाडीत ढकलण्यात आले. भारतातील शेतकरी असं करू शकत नाही.

लखीमपूर खीरीमध्ये नेमकं काय घडलं
केंद्रीय मंत्री अजय मिश्रा तेनी यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून २५ सप्टेंबर रोजी हे आंदोलन सुरू झाले होते. एका कार्यक्रमाला जाताना अजय मिश्रा यांना आंदोलक शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवले होते. तेव्हा शेतकऱ्यांनी वेळीच सुधरावं, अन्यथा त्यांना सुधारले जाईल, असा इशारा दिला होता. तेव्हापासून केंद्रीय मंत्र्यांविरोधात आंदोलन सुरू आहे.  दरम्यान, रविवारी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे तेनी यांच्या उपस्थितीत एका सरकारी प्रोजेक्टच्या अनावरणासाठी येत असताना परिस्थिती अधिक चिघळली. शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री ज्या हेलिपॅडवर उतरणार होते त्या हेलिपॅडवर कब्जा केला. त्यानंतर कार्यक्रमाला जाण्यासाठी  रस्त्याने जायचे ठरवले. केशव प्रसाद मौर्य आणि तेनी यांनी दुपारी लखीमपूर येथे प्रकल्पाचे उदघाटन केले. त्यानंतर केंद्रीय मंत्री आपल्या बनवीरपूर यि गावाकडे रवाना झाले. तिथे कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र तत्पूर्वीच तिकुनिया येथे हा हिंसाचार घडला. तेव्हापासून येथील वातावरण तापलेले आहे. शेतकऱ्यांचा दावा आहे की, केंद्रीय मंत्री तेनी यांचा मुलगा आशिष कुमार मोनू हत्यारबंद समर्थकांसह त्या गाडीमध्ये होता ज्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडले.  मात्र मोनू तिथून पळ काढण्यात यशस्वी ठरला. शेतकऱ्यांनी मंत्री तेनी आणि त्यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  

Web Title: Lakhimpur Kheri Violence: Ashish Mishra The son of a Union Minister, the main accused in the Lakhimpur violence, came forward and said, "If I were there, I would not have survived."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.