Lakhimpur Kheri Violence: लखीमपूर खीरी हिंसाचारातील मृतांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला समोर, धक्कादायक माहिती झाली उघड 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 10:29 AM2021-10-05T10:29:52+5:302021-10-05T10:32:41+5:30

Lakhimpur Kheri Violence Update: उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरीमध्ये रविवारी झालेल्या हिंसाचारामध्ये मृत्यू झालेल्या आठ लोकांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला आहे.

Lakhimpur Kheri Violence: Postmortem report of Lakhimpur Kheri violence victims revealed, shocking information revealed | Lakhimpur Kheri Violence: लखीमपूर खीरी हिंसाचारातील मृतांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला समोर, धक्कादायक माहिती झाली उघड 

Lakhimpur Kheri Violence: लखीमपूर खीरी हिंसाचारातील मृतांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला समोर, धक्कादायक माहिती झाली उघड 

googlenewsNext

लखनौ - उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरीमध्ये रविवारी झालेल्या हिंसाचारामध्ये मृत्यू झालेल्या आठ लोकांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टनुसार कुणाचा मृत्यू शॉक लागून, तर कुणाचा मृत्यू हॅमरेजमुळे झाला आहे. मात्र गोळी लागून कुणाचाही मृत्यू झाला नसल्याचे पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. या हिंसाचारात मारल्या गेलेल्या व्यक्तींचे सोमवारी पोस्टमार्टेम करण्यात आले आहे. (Postmortem report of Lakhimpur Kheri violence victims revealed)

पोस्टमार्टेम रिपोर्टमधून मृतांच्या मृत्यूची समोर आलेली कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 
१) लवप्रीत सिंग (शेतकरी) - फरफटत गेल्यामुळे मृत्यू, शरीरावर जखमांच्या खुणा, शॉक आणि हॅमरेज मृत्यूचे कारण
२) गुरविंदर सिंग (शेतकरी) - दोन जखमा आणि फरफटल्याच्या खुणा. धारदार किंवा टोकदार वस्तूमुळे झाल्या जखमा. शॉक आणि हॅमरेज 
३) दलजीत सिंग (शेतकरी) - शरीरावर अनेक ठिकाणी फरफटल्याच्या खुणा, तेच ठरले मृत्यूचे कारण. 
४) छत्र सिंग (शेतकरी) - मृत्यूपूर्वी शॉक, हॅमरेज आणि कोमा. फरफटल्याच्याही खुणा मिळाल्या. 
५) शुभम मिश्रा (भाजपा नेता) - लाठ्या-काठ्यांनी झाली मारहाण. शरीरावर डझनभराहून अधिक ठिकाणी मिळाल्या जखमांच्या खुणा.
६) हरिओम मिश्रा (अजय मिश्राचा ड्रायव्हर) - लाठ्याकाठ्यांनी मारहाण. शरीरावर अनेक ठिकाणी जखमांच्या खुणा. मृत्यूपूर्वी शॉक आणि हॅमरेज.
७) श्याम सुंदर (भाजपा कार्यकर्ता) - लाठ्याकाठ्यांनी मारहाण, घसटल्यामुळे डझनभरपेक्षा अधिक जखमा. 
८) रमण कश्यप (स्थानिक पत्रकार) - शरीरावर मारहाणीच्या गंभीर खुणा, शॉक आणि हॅमरेजमुळे झाला मृत्यू.

दरम्यान, सोमवारी प्रशासन आणि शेतकऱ्यांमध्ये वाटाघाटी झाल्या. त्यामध्ये हिंसाचारात मारल्या गेलेल्या चार शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ४५-४५ लाख रुपयांची नुकसान भरपाई आणि कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचे सरकारने मान्य केले. तसेच हिंसाचारात जखमी झालेल्यांना १० लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाईल. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधीशांकडून करण्यात येईल. 

लखीमपूरमध्ये काय झालं होतं?
केंद्रीय मंत्री अजय मिश्रा तेनी यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून २५ सप्टेंबर रोजी हे आंदोलन सुरू झाले होते. एका कार्यक्रमाला जाताना अजय मिश्रा यांना आंदोलक शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवले होते. तेव्हा शेतकऱ्यांनी वेळीच सुधरावं, अन्यथा त्यांना सुधारले जाईल, असा इशारा दिला होता. तेव्हापासून केंद्रीय मंत्र्यांविरोधात आंदोलन सुरू आहे.  दरम्यान, रविवारी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे तेनी यांच्या उपस्थितीत एका सरकारी प्रोजेक्टच्या अनावरणासाठी येत असताना परिस्थिती अधिक चिघळली. शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री ज्या हेलिपॅडवर उतरणार होते त्या हेलिपॅडवर कब्जा केला. त्यानंतर कार्यक्रमाला जाण्यासाठी  रस्त्याने जायचे ठरवले. केशव प्रसाद मौर्य आणि तेनी यांनी दुपारी लखीमपूर येथे प्रकल्पाचे उदघाटन केले. त्यानंतर केंद्रीय मंत्री आपल्या बनवीरपूर यि गावाकडे रवाना झाले. तिथे कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र तत्पूर्वीच तिकुनिया येथे हा हिंसाचार घडला. तेव्हापासून येथील वातावरण तापलेले आहे. शेतकऱ्यांचा दावा आहे की, केंद्रीय मंत्री तेनी यांचा मुलगा आशिष कुमार मोनू हत्यारबंद समर्थकांसह त्या गाडीमध्ये होता ज्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडले.  मात्र मोनू तिथून पळ काढण्यात यशस्वी ठरला. शेतकऱ्यांनी मंत्री तेनी आणि त्यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  

Web Title: Lakhimpur Kheri Violence: Postmortem report of Lakhimpur Kheri violence victims revealed, shocking information revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.