Lakhimpur kheri Violence: लखीमपूर हिंसाचार; गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्राविरोधात 5 हजार पानांचे आरोपपत्र दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 02:41 PM2022-01-03T14:41:23+5:302022-01-03T18:50:27+5:30

Lakhimpur kheri Violence: लखीमपूर खेरी हिंसाचाराला आज 90 दिवस पूर्ण झाले आहेत. याप्रकरणी एसआयटीने न्यायालयात 5 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

Lakhimpur violence; chargesheet filed against Home Minister for state Ajay mishra Teni's Son Ashish Mishra | Lakhimpur kheri Violence: लखीमपूर हिंसाचार; गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्राविरोधात 5 हजार पानांचे आरोपपत्र दाखल

Lakhimpur kheri Violence: लखीमपूर हिंसाचार; गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्राविरोधात 5 हजार पानांचे आरोपपत्र दाखल

Next

लखीमपूर: लखीमपूर खेरी हिंसाचाराला आज 90 दिवस पूर्ण झाले आहेत. याप्रकरणी एसआयटीने (SIT) न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. हे आरोपपत्र 5 हजार पानांचे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा टेनीसह नातेवाईक वीरेंद्र कुमार शुक्लाचे नावही जोडले गेले आहे. वीरेंद्र कुमार शुक्ला यांच्यावर कलम 201 अंतर्गत पुरावे नष्ट करण्याचे आरोप आहेत.

न्यायालयाबाहेर माध्यमांशी बोलताना शेतकऱ्यांच्या वकिलांनी सांगितले की, आरोपपत्रात मंत्री अजय मिश्रा यांचे नाव जोडण्यासाठी अर्ज करण्यात आला होता, मात्र त्यांचे नाव आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आलेले नाही. दरम्यान, लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांच्या निदर्शनादरम्यान गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा टेनी याने शेतकऱ्यांवर गाडी चढवल्याचा आरोप आहे. त्यादरम्यान झालेल्या हिंसाचारात 8 जणांचा मृत्यू झाला होता. विशेष तपास पथकाचे हजारो पानांचे आरोपपत्र आज सकाळी लखीमपूर खेरी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात पोहोचले. 

आशिष मिश्रा जामिनावर 6 जानेवारीला सुनावणी
3 ऑक्टोबर रोजी लखीमपूरच्या तुकानिया येथे एका पत्रकारासह 8 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी गुन्हा दाखल करण्यात आला होता. उत्तर प्रदेश एसआयटी या प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणी मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रासह 13 जण न्यायालयीन कोठडीत आहेत. आशिष मिश्राच्या जामीन अर्जावर 6 जानेवारीला सुनावणी होणार आहे.

कलम वाढविण्याची माहिती शेतकऱ्यांच्या वकिलांनी दिली

हिंसाचार प्रकरणात शेतकऱ्यांचे वकील अमन म्हणाले की, एफआयआरमध्ये कलम 201 वाढवण्यात आले आहे. तसेच वीरेंद्र कुमार शुक्ला यांचे नाव जोडले गेले आहे. मंत्र्याचे नावही जोडण्याची विनंती केली होती, मात्र त्यांचे नाव जोडले गेले नाही. दरम्यान, एसआयटीच्या इन्स्पेक्टर विद्या राम दिवाकर यांनी हा अपघात नसून सुनियोजित कट असल्याचे म्हटले होते. 

आशिष मिश्रावर या कलमांतर्गत गुन्हे दाखल
गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा आणि सहकारी नंदन सिंगवर कलम 177(मोटार वाहन कायदा) आणि 5/25 (आर्म्स अॅक्ट) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत आरोपपत्र आरोपींना दाखवण्यात आलेले नाही. कोर्टाने आरोपपत्राची दखल घेतल्यानंतर कलम 309 अन्वये सर्व आरोपींना कोर्टात बोलावून आरोपपत्राची प्रत दिली जाईल.

हिंसाचारात 8 जणांचा मृत्यू 

लखीमपूर येथे 3 ऑक्टोबर रोजी झालेल्या घटनेत चार शेतकरी, स्थानिक पत्रकार यांच्यासह आठ जणांचा मृत्यू झाला होता. आशिष मिश्रा आणि त्यांच्या साथीदारांवर गोळीबार करताना शेतकऱ्यांना त्यांच्या गाडीने तुडवल्याचा आरोप आहे. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले. 4 ऑक्टोबर रोजी टिकुनिया पोलीस ठाण्यात आशिष मिश्रा आणि इतर अनेकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला होता. त्यानंतर एसआयटीच्या तपासात हा अपघात नसून सुनियोजित कटातून केलेला खून असल्याचे उघड झाले.
 

Web Title: Lakhimpur violence; chargesheet filed against Home Minister for state Ajay mishra Teni's Son Ashish Mishra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.