गर्ल्स हॉस्टेलच्या रिकाम्या खोलीत सापडले लाखो रूपयांच्या हिऱ्यांचे दागिने व घड्याळं, तामिळनाडूत आयकर विभागाचं धाडसत्र सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2017 05:35 PM2017-11-11T17:35:38+5:302017-11-11T17:44:16+5:30

तामिळनाडूतील तिरूवरूर जिल्ह्यातील एका महिला कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये तपास करत असताना आयकर विभागाला घबाड सापडलं आहे.

Lakhs of diamond jewelery and watches found in empty rooms in girls hostel, commencement of income-tax department in Chennai | गर्ल्स हॉस्टेलच्या रिकाम्या खोलीत सापडले लाखो रूपयांच्या हिऱ्यांचे दागिने व घड्याळं, तामिळनाडूत आयकर विभागाचं धाडसत्र सुरूच

गर्ल्स हॉस्टेलच्या रिकाम्या खोलीत सापडले लाखो रूपयांच्या हिऱ्यांचे दागिने व घड्याळं, तामिळनाडूत आयकर विभागाचं धाडसत्र सुरूच

Next
ठळक मुद्दे तामिळनाडूतील तिरूवरूर जिल्ह्यातील एका महिला कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये तपास करत असताना आयकर विभागाला घबाड सापडलं आहे.हॉस्टेलमधील एका बंद खोलीत आयकर विभागाला लाखो रूपयांचे दागिने व घड्याळं सापडली.

चेन्नई- तामिळनाडूतील तिरूवरूर जिल्ह्यातील एका महिला कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये तपास करत असताना आयकर विभागाला घबाड सापडलं आहे. या हॉस्टेलमधील एका बंद खोलीत आयकर विभागाला लाखो रूपयांचे दागिने व घड्याळं सापडली. एआयएडीएमकेच्या सदस्य शशिकला आणि त्यांच्या नातेवाईकांशी संबंधित संपत्तीची माहिती जमा करत असताना आयकर विभागाने या हॉस्टेलवर धाड मारली. 

आयकर विभागाने आत्तापर्यंत 6 करोड रूपये कॅश, 2 कोटी 4 लाख रूपये किंमतीच साडेआड किलो सोनं आणि 1200 करोड रूपयांच्या गुंतवणुकीची कागदपत्र जप्त केली आहेत. या सगळ्या वस्तूंच्या उत्पन्नाचा कुठलाही मार्ग मालकांनी सांगितला नाही. 

आयकर विभागाने शशिकला यांचा भाऊ व्ही धीवाहरन यांच्या मालकीच्या असलेल्या सेंगमाल थय्यर एज्युकेशनल ट्रस्ट वुमन्स कॉलेजवर धाड टाकली. हॉस्टेलमध्ये असेलल्या एका बंद खोलीत आयकर विभागाला हिऱ्यांचे दागिने आणि रोलेक्सची घड्याळं सापडली आहेत. या दागिने व घड्याळ्यांची एकुण किंमत आयकर विभागाकडून तपासली जाते आहे. 

आयकर विभागाचे अधिकारी हॉस्टेलमध्ये जात असताना 12 समर्थकांनी त्यांना हॉस्टेलमध्ये जाण्यापासून रोखलं. त्यावेळी हॉस्टेलमध्ये किंमती सामान असल्याची चूणचूक आयकर विभागाला लागली होती. धीराहरन यांना फसविण्यासाठी आयकर विभागाचे अधिकारी मौल्यवान वस्तू हॉस्टेलमध्ये मुद्दामून ठेवतील, असं ते म्हणाले होते. या बारा जणांना अटक करण्यात आली आहे. 

आत्तापर्यंत आयकर विभागाने 188 पैकी 50 कॅम्पसची तपासणी शुक्रवारी केली. ऑपरेशन क्लिन मनीच्या अंतर्गत शनिवारीसुद्धा धाड सत्र सुरू आहे. 
 

Web Title: Lakhs of diamond jewelery and watches found in empty rooms in girls hostel, commencement of income-tax department in Chennai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.