यूपीसह चार राज्यांत कमळ; पंजाबमध्ये सत्तांतर अटळ !

By admin | Published: March 10, 2017 06:42 AM2017-03-10T06:42:08+5:302017-03-10T06:43:43+5:30

पाच राज्यांच्या विधानसभांची मतमोजणी शनिवारी सकाळी होणार असली तरी विविध एक्झिट पोलचे निकाल आले असून, ते खरे निघाल्यास देशात मोदी लाट कायम असल्याचे दिसते.

Lakhs in four states with UP; Punjab is inaccessible to power! | यूपीसह चार राज्यांत कमळ; पंजाबमध्ये सत्तांतर अटळ !

यूपीसह चार राज्यांत कमळ; पंजाबमध्ये सत्तांतर अटळ !

Next

नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभांची मतमोजणी शनिवारी सकाळी होणार असली तरी विविध एक्झिट पोलचे निकाल आले असून, ते खरे निघाल्यास देशात मोदी लाट कायम असल्याचे दिसते. उत्तर प्रदेश व मणिपूरमध्ये भाजपाला संपूर्ण बहुमत मिळेल. पंजाबमध्ये काँग्रेस व ‘आप’मध्ये अटीतटीच्या लढतीची शक्यता एक्झिट पोल्सनी व्यक्त केली आहे. उत्तराखंडात भाजपाला बहुमत मिळेल, असे निष्कर्ष काही एक्झिट पोल्समध्ये आहेत, तर काहींनी तिथे काँग्रेसला कसेबसे बहुमत मिळू शकेल, अशी शक्यता व्यक्त केली आहे. मणिपूर व गोव्यातही भाजपाला बहुमत मिळेल, असे एक्झिट पोल सांगतात.

...तर सर्वांत अडचण काँग्रेसची एक्झिट पोलच्या निष्कर्षानुसारच निकाल लागल्यास सर्वाधिक अडचण होणार आहे ती काँग्रेसची. उत्तराखंडात व मणिपूरमध्ये भाजपा सत्तेवर आल्यास काँग्रेसकडून आणखी दोन राज्ये जातील. पंजाबमध्ये काँग्रेस की आम आदमी पक्ष यांच्यात स्पष्ट लढाई दिसत असली आणि काँग्रेस तिथे सत्तेवर येईल, असे जाणकार सांगत असले तरी ते राज्य आपकडे गेल्यास सर्वच राज्यांतून काँग्रेस साफ जाईल.

काँग्रेसचा जीव अडकला आहे तो पंजाबमध्ये. उत्तर प्रदेशात काँग्रेसचा जीवच लहान आहे. गोव्यात काँग्रेस सत्तेची स्वप्ने पाहत असली तरी एक्झिट पोलचे निष्कर्ष तसे नाहीत. आज कर्नाटक व हिमाचल प्रदेश याखेरीज काँग्रेसकडे कोणतेही मोठे राज्य नाही. अशा स्थितीत पंजाबही गेले, तर काँग्रेसची अवस्था तोळामासा होईल.

काय सांगतात एक्झिट पोल?

Web Title: Lakhs in four states with UP; Punjab is inaccessible to power!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.