धक्कादायक! सुकन्या समृद्धी योजनेत जमा केलेले लाखो रुपये पोस्टातून गायब; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 02:27 PM2021-08-25T14:27:21+5:302021-08-25T14:37:58+5:30

Post Office : सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) आणि बचत खात्याअंतर्गत (Savings account) जमा केलेले लाखो रुपये पोस्ट ऑफिसमधून अचानक गायब झालेत.

lakhs of rupees deposited in sukanya samriddhi yojana disappeared from the post office | धक्कादायक! सुकन्या समृद्धी योजनेत जमा केलेले लाखो रुपये पोस्टातून गायब; नेमकं काय घडलं?

धक्कादायक! सुकन्या समृद्धी योजनेत जमा केलेले लाखो रुपये पोस्टातून गायब; नेमकं काय घडलं?

googlenewsNext

नवी दिल्ली - पोस्ट ऑफिसच्या (Post Office) सुकन्या समृद्धी योजनेमध्ये (SSY) पैसे जमा करणाऱ्यांसाठी आता एक अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) आणि बचत खात्याअंतर्गत (Savings account) जमा केलेले लाखो रुपये उत्तर प्रदेशच्यापोस्ट ऑफिसमधून अचानक गायब झालेत. उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यातील बरौत भागातील पोस्ट ऑफिसमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोस्टाने विभागीय चौकशीत दोषी आढळलेल्या एका अधिकाऱ्याला निलंबित केलं आहे. 

दोषी आढळलेल्या अधिकाऱ्याविरोधात खटला दाखल करण्याची तयारीही करण्यात आली आहे. अनेक गावकऱ्यांनी आपल्या गावाच्या पोस्ट ऑफिसमध्ये जवळपास 18.50 लाख रुपये जमा केले होते. यामध्ये सुकन्या समृद्धी योजना, बचत खाते आणि आरडीमधील पैशांचा समावेश होता. मीडिया रिपोर्टनुसार, पोस्ट ऑफिसमध्ये तैनात असलेला अधिकारी देवेंद्र यांनी ही रक्कम चोरली. त्यामुळे संपूर्ण विभागाला किंवा खातेदारांना ती मिळाली नाही. पोस्टातील पैसे गायब झाल्याची बाब उघड होताच खातेदार अस्वस्थ झाले. त्यांनी तात्काळ त्याबद्दल तक्रार केली. 

तक्रार मिळताच विभागीय चौकशी सुरू झाली. तपासात दोषी आढळल्यानंतर अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले. अधिकाऱ्याकडे कोणी पैसे जमा करायला गेल्यानंतर तो त्यांच्याकडून पैसे घ्यायचा, पण खात्यात जमा केल्याची एंट्री करायचा नाही. यासोबतच तो खातेदारांच्या पासबुकची हातानेच एंट्री करत होता. तो जमा केलेले पैसे त्याच्याकडे ठेवत असे. अशा प्रकारे त्याने 18 लाख 50 हजार रुपयांवर डल्ला मारल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. 

खातेधारकांना वाटले की, त्यांच्या कष्टाचे पैसे पोस्ट ऑफिसमध्ये जमा केले जात आहेत. काही गावकरी पासबुकमध्ये एंट्री घेण्यासाठी गेले असता, त्यांनी संगणकाद्वारे आपले पासबुक अपडेट करण्यास सांगितले. त्यावेळी लोकांनी जमा केलेली रक्कमच नव्हती. यानंतर त्यांनी हेड पोस्ट ऑफिस बरौतमध्ये एंट्री केली, तरीसुद्धा त्यांच्या खात्यात पैसे नव्हते. मग हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Web Title: lakhs of rupees deposited in sukanya samriddhi yojana disappeared from the post office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.