लख्वी व दाऊदला मोदी फासावर लटकवतील - तोगडिया यांचा आशावाद

By admin | Published: July 12, 2015 06:28 PM2015-07-12T18:28:19+5:302015-07-12T18:28:34+5:30

झकीऊर रहमान लख्वी व कुख्यात डॉन दाऊद इब्राहीमला भारतात आणून त्यांना फासावर लटकवतील अशी आशा विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केली आहे.

Lakhvi and Dawood should hang on to death - Togadia's optimism | लख्वी व दाऊदला मोदी फासावर लटकवतील - तोगडिया यांचा आशावाद

लख्वी व दाऊदला मोदी फासावर लटकवतील - तोगडिया यांचा आशावाद

Next

 ऑनलाइन लोकमत 

अहमदाबाद, दि. १२ - पंतप्रधान नरेंद्र मोदी २६/११ च्या मुंबई हल्ल्याचा सुत्रधार झकीऊर रहमान लख्वी व कुख्यात डॉन दाऊद इब्राहीमला भारतात आणून त्यांना फासावर लटकवतील अशी आशा विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केली आहे. या दोघांना फाशीची शिक्षा झाल्यास दुस-यांना धडा मिळेल असेही त्यांनी म्हटले आहे. 
अहमदाबादमधील एका कार्यक्रमात प्रवीण तोगडिया यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मोदींच्या पाकिस्तान दौ-याविषयी प्रश्न विचारले असता तोगडिया म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानमधून दाऊद व लख्वींना भारतात आणून त्यांना फासावर लटकवतील हीच आशा आहे. राम मंदिर बांधण्यासाठी सरकारकडे बहुमत हवे होते व विद्यमान सत्ताधा-यांकडे बहुमत आहे याकडेही तोगडिया यांनी लक्ष वेधले. लव्ह जिहादच्या मुद्द्यावर पुढील महिन्यात देशभरात मोहीम सुरु करु असे त्यांनी जाहीर केले. 

Web Title: Lakhvi and Dawood should hang on to death - Togadia's optimism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.