लख्वीप्रकरणात भारताला संयुक्त राष्ट्राची साथ
By admin | Published: May 3, 2015 05:19 PM2015-05-03T17:19:21+5:302015-05-03T17:27:31+5:30
२६/११ च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झकीऊर रेहमान लख्वी याच्या सुटकेचा मुद्दा पुढील बैठकीत उपस्थित करु असे आश्वासन संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने भारताला दिले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - २६/११ च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झकीऊर रेहमान लख्वी याच्या सुटकेचा मुद्दा पुढील बैठकीत उपस्थित करु असे आश्वासन संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने भारताला दिले आहे.
लष्कर ए तोयबाचा कमांडर झकीऊर लख्वीची काही दिवसांपूर्वी तुरुंगातून सुटका झाली होती. शनिवारी भारताने लख्वीच्या सुटकेचे प्रकरण संयुक्त राष्ट्रात मांडले होते. पाकिस्तानने या प्रकरणात आंतरराष्ट्रीय संकेताचा भंग केल्याचा आरोप भारताने केला होता. दहशतवादी कारवायांमध्ये असल्याने लख्वीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे मग त्याला जामीनासाठी पैसे कुठून आले याकडेही भारताने संयुक्त राष्ट्राचे लक्ष वेधले होते. भारताच्या या मागणीवर संयुक्त राष्ट्राने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने भारताच्या पत्रावर उत्तर दिले आहे. पुढील बैठकीत हा मुद्दा उपस्थित करु असे या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडी करण्याची भारताची खेळी आता यशस्वी ठरु लागली आहे.