लख्वीला पुन्हा जामीन; सुटका मात्र अशक्य
By admin | Published: January 10, 2015 12:21 AM2015-01-10T00:21:13+5:302015-01-10T00:21:13+5:30
मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झकी-उर-रहमान लख्वीला पाकिस्तानातील एका न्यायालयाने अफगाण नागरिकाच्या अपहरण प्रकरणात जामीन दिला आहे.
इस्लामाबाद : लष्कर-ए-तोयबाचा कमांडर आणि मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झकी-उर-रहमान लख्वीला पाकिस्तानातील एका न्यायालयाने अफगाण नागरिकाच्या अपहरण प्रकरणात जामीन दिला आहे. मात्र, सार्वजनिक सुव्यवस्था कायद्याखालील त्याच्या स्थानबद्धतेबाबत दुसरे न्यायालय निकाल देईपर्यंत त्याची कारागृहातून सुटका होऊ शकणार नाही. अफगाण नागरिक अन्वर खान याच्या अपहरण प्रकरणात जामिनासाठी लख्वीने अर्ज दाखल केला होता. तो मंजूर करण्यात आला. (वृत्तसंस्था)
इस्लामाबादेतील कनिष्ठ न्यायालयाने काल दाखल करून घेतला.
.प्राथमिक माहिती अहवालात नमूद अन्वर खान नामक व्यक्ती कपोलकल्पित आहे, असेही आपण न्यायालयास सांगितल्याचे अब्बासी म्हणाले. सरकारने भारताच्या दबावामुळे लख्वीविरुद्ध खटला दाखल करण्याची घाई केली. भारत मुंबई हल्ला प्रकरणाच्या खटल्यात आपल्या अशिलाला जामीन मिळाल्यावरून नाराज होता. त्यामुळे काहीही करून लख्वीला तुरुंगात ठेवावे यासाठी अपहरणाची ही कथा रचण्यात आली, असा दावा अब्बासींनी केला. दुसरीकडे सरकारी वकिलांनी लख्वीच्या अटकेचे समर्थन केले. इस्लामाबाद पोलीस खान अपहरण प्रकरणाचा तपास करत होते. ही व्यक्ती सहा वर्षांपासून बेपत्ता आहे. त्याच्याविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी आरोपीची कोठडी मिळवणे आवश्यक आहे, असे सरकारी वकिलांनी सांगितले. लख्वीला १५ जानेवारी रोजी न्यायाधीशांसमोर हजर करण्यात येणार असून तेव्हा पोलीस त्याच्या कोठडीची मागणी करतील, असेही सरकार पक्षाने स्पष्ट केले. मात्र, न्यायाधीशांनी लख्वीला जामीन दिला.
न्यायालयाने दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर लख्वीला जामीन दिला, असे त्याचे वकील राजा रिझवान अब्बासी यांनी सांगितले. आपल्या अशिलाला खोट्या व बनावट प्रकरणामध्ये गोवण्यात आले असल्याचे आपण न्यायाधीशांना सांगितले. आपल्या अशिलाला स्थानबद्ध ठेवण्याचे सरकारचे आदेश न्यायालयाने निलंबित केल्यानंतर पोलिसांनी त्याला कारागृहात ठेवण्यासाठी ही खोटी कथा रचली आहे, असे अब्बासी म्हणाले.