लख्वी सुटणार मोकाट

By admin | Published: December 30, 2014 02:30 AM2014-12-30T02:30:04+5:302014-12-30T02:30:04+5:30

मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झकी-उर रहमान लख्वी याला सार्वजनिक सुरक्षा कायद्याखाली स्थानबद्ध करण्याचा पाकिस्तान सरकारचा आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी निलंबित केला.

Lakhvi will be left out | लख्वी सुटणार मोकाट

लख्वी सुटणार मोकाट

Next

भारताची तीव्र नाराजी : स्थानबद्धतेचा आदेश निलंबित
इस्लामाबाद/लाहोर : मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झकी-उर रहमान लख्वी याला सार्वजनिक सुरक्षा कायद्याखाली स्थानबद्ध करण्याचा पाकिस्तान सरकारचा आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी निलंबित केला. लख्वीच्या सुटकेचा मार्ग प्रशस्त होऊ लागल्याने भारत चिंतित असून, भारताने आपली नाराजी ताव्र शब्दांत व्यक्त केली.
२६/११च्या खटल्यात लख्वीला जामीन मिळाल्यानंतर चौफेर टीका होऊ लागल्याने सरकारने त्यास सार्वजनिक सुरक्षा कायद्याखाली स्थानबद्ध केले होते. त्यामुळे जामीन मिळूनही लख्वी तुरुंगातून सुटू शकला नव्हता.
मात्र, न्यायालयाने स्थानबद्धतेचे हे आदेशच निलंबित करून लख्वीच्या सुटकेच्या मार्गातील अडसर हटवला. अर्थात या निकालानंतरही सरकार त्याला दुसऱ्या एखाद्या प्रकरणात अटक करण्याची लक्षणे असल्याने त्याची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता नाही.
लख्वीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नुरूल हक कुरेशी यांनी सार्वजनिक सुरक्षा कायद्याखाली लख्वीला स्थानबद्ध करण्याचे आदेश निलंबित केले. इस्लामाबादच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने १८ डिसेंबर रोजी मुंबई हल्ला प्रकरणी लख्वीविरुद्ध पुरावा नसल्याचे सांगत त्याला जामीन मंजूर केला होता. मात्र, त्याची सुटका होण्यापूर्वी सरकारने सार्वजनिक सुरक्षा कायद्याखाली ताब्यात घेऊन त्याला पुन्हा तीन महिन्यांसाठी कारागृहात डांबले होते.

सुनावले खडे बोल...
च्लख्वीविरुद्ध कुठलीही ठोस कारवाई न केल्याबद्दल भारताने पाकिस्तानसमक्ष सोमवारी तीव्र चिंता व्यक्त केली़ पाकिस्तान अद्यापही कुख्यात अतिरेकी संघटनांना अभय देत असल्याचे खडे बोलही भारताने पाकला सुनावले़
च्परराष्ट्र सचिव सुजाता सिंह यांनी सोमवारी पाकचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांना पाचारण केले आणि या मुद्द्यावर त्यांच्यासमक्ष तीव्र आक्षेप नोंदवला़ पाकिस्तानातही भारतीय उच्चायुक्तालयाने पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयासमक्ष हा मुद्दा उपस्थित केला़

Web Title: Lakhvi will be left out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.