'लक्ष्मी'! एक जानेवारीला जन्मल्यास 5 लाख मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 01:59 PM2017-12-29T13:59:28+5:302017-12-29T13:59:54+5:30
मुलींची संख्या वाढवण्यासाठी आणि स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना येत असतात.
बंगळुरू - मुलींची संख्या वाढवण्यासाठी आणि स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना येत असतात. कर्नाटकातील बंगळुरूत एक जानेवारी रोजी जन्माला येणारी मुलगी 'लक्ष्मी'च्या पावलानं घरी येणार आहे. कर्नाटकातील बंगळुरू महापालिका रुग्णालयात एक जानेवारी रोजी जन्माला येणाऱ्या मुलीला तिच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन म्हणून तब्बल पाच लाख रुपये देण्यात येणार आहेत.
नववर्षाच्या 1 तारखेला बंगळुरू महापालिकेच्या रुग्णालयांत मुलगी जन्माला आल्यास तिच्या भविष्यासाठी प्रशासनातर्फे पाच लाख रुपये देण्यात येणार आहेत. महापौर आर. संपत राज यांनी ही माहिती दिली. महापालिकेच्या वतीने देण्यात येणारे पाच लाख रुपये महापालिका आयुक्त आणि मुलीच्या संयुक्त बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. ही रक्कम मुलीच्या शिक्षणासाठी खर्च करण्यात येणार आहे.