श्रीरामांच्या कृपेने लक्ष्मी प्रसन्न; ऑक्टोबरपासून अयोध्या, पर्यटनाशी संबंधित कंपन्यांचे शेअर्स तेजीत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 08:24 AM2024-01-23T08:24:56+5:302024-01-23T08:25:57+5:30

येत्या काळातही देशात अध्यात्मिक पर्यटन वाढीचे संकेत दिसत आहेत.

Lakshmi is pleased by the grace of Sri Rama; Since October Ayodhya, shares of companies related to tourism are booming | श्रीरामांच्या कृपेने लक्ष्मी प्रसन्न; ऑक्टोबरपासून अयोध्या, पर्यटनाशी संबंधित कंपन्यांचे शेअर्स तेजीत

श्रीरामांच्या कृपेने लक्ष्मी प्रसन्न; ऑक्टोबरपासून अयोध्या, पर्यटनाशी संबंधित कंपन्यांचे शेअर्स तेजीत

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होत असतानाच संपूर्ण देशभर उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. याचवेळी राम मंदिराशी संबंधित उद्योगाचे शेअर्स सोमवारीच नव्हे तर ऑक्टोबर महिन्यापासून सातत्याने तेजीत आहेत. बाजारावर नीट लक्ष ठेवून असलेल्या किरकोळ गुंतवणूकदारांनी या शेअर्समध्ये आपली गुंतवणूक वाढविली आहे. 

येत्या काळातही देशात अध्यात्मिक पर्यटन वाढीचे संकेत दिसत आहेत. सरकारने पर्यटनाला चालना दिल्याने जीडीपीमध्ये या क्षेत्राचा वाटा वाढू शकतो. येत्या काळात आयआरसीटीसी, इंडियन हॉटेल्स, थॉमस कुक, प्रावेग आणि इंटरग्लोब एव्हिएनशन या कंपन्यांचे शेअर्सवर गुंतवणूकदार आणखी पैसे गुंतवू शकतात, असे जाणकारांचे म्हणणे आहे. देशातील मोठमोठ्या बांधकाम कंपन्यांनीही अयोध्येकडे मोेर्चा वळवल्याने शहराच्या विकासाला हातभार लागणार आहे. 

अलाइड डिजिटल सर्व्हिसेस
या कंपनीला अयोध्येतील स्मार्ट सिटी प्रकल्पात एक कंत्राट मिळाले आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीत परदेशी संस्थात्मक गुंतणूकदारांची कसलाही हिस्सा नव्हता. डिसेंबर तिमाहीत हा हिस्सा एक टक्के झाला. 

इझी ट्रीप प्लानर्स 
प्रवासी सेवा पुरवणाऱ्या इझी ट्रीप प्लानर्स या कंपनीतील किरकोळ गुंवणूकदारांचा हिस्सा वाढला आहे. ऑक्टोबरपासून कंपनीचा शेअर १४ टक्क्यांनी वाढला आहे. महिनाभरात हा शेअर आणखी २० टक्क्यांनी वाढला आहे.

थॉमस कुक इंडिया 
प्रवासी सेवा देणाऱ्या थॉमस कुक इंडिया या कंपनीवरही किरकोळ गुंतवणूदारांनी विश्वास दाखवला आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीतील ऑक्टोबरपासून कंपनीचा शेअरमध्ये ३५ टक्क्यांची वृद्धी दिसून आली आहे.

इंटरग्लोब एव्हिएशन 
देशातील सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी इंडिगोचे संचालन करणाऱ्या इंटरग्लोब एव्हिएशन कंपनीतील किरकोळ गुंतवणूकदारांचा हिस्सा वाढला आहे. 

Web Title: Lakshmi is pleased by the grace of Sri Rama; Since October Ayodhya, shares of companies related to tourism are booming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.