ललित मोदी बेभान; दिल्लीत अस्वस्थता

By admin | Published: June 26, 2015 02:09 AM2015-06-26T02:09:18+5:302015-06-26T02:09:18+5:30

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या सचिव ओमिता पॉल यांच्यासह इतर अनेकांच्या बाबतीत एका पाठोपाठ एक रहस्योद्घाटन करीत असलेले आयपीएलचे माजी आयुक्त ललित

Lalit Modi is absurd; Unrest in Delhi | ललित मोदी बेभान; दिल्लीत अस्वस्थता

ललित मोदी बेभान; दिल्लीत अस्वस्थता

Next

हरीश गुप्ता, नवी दिल्ली
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या सचिव ओमिता पॉल यांच्यासह इतर अनेकांच्या बाबतीत एका पाठोपाठ एक रहस्योद्घाटन करीत असलेले आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी प्रक्षुब्ध झालेले असले तरी भाजपा नेतृत्वाने मात्र कठोरपणे वागण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपाच्या चार महिला मंंत्र्यांपैकी कुणाचाही बळी दिला जाणार नाही, असे भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी निवडक पत्रकारांना सांगितले.
संपुआच्या राजवटीत फायदा झालेल्या सर्व शीर्ष नोकरशहा, राजकीय पुढारी, मीडिया घराणे आणि अन्य लोकांचा आपण पर्दाफाश करणार असल्याची धमकी ललित मोदी यांनी टिष्ट्वटरवरून दिल्यानंतर काँग्रेस नेतृत्वही जाम हादरले आहे. राष्ट्रपती भवनाने मात्र मोदींच्या आरोपाचे खंडन केले. परंतु २००९-१२ दरम्यान वित्त मंत्रालयात घडलेल्या घोटाळ्याचा पर्दाफाश करण्याची धमकीही ललित मोदी यांनी दिल्याने आता त्यांच्या टिष्ट्वटरवर पुढे काय प्रकटणार, याबाबत दिल्लीत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. या कारणामुळेच की काय काँग्रेसने आता परराष्ट्रमंत्री
सुषमा स्वराज यांच्याऐवजी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनाच आपले लक्ष्य करण्याचे
ठरविले आहे. हा वाद आणखी चिघळू नये असे वाटत असल्यानेच काँग्रेसने राजेंकडे आपले लक्ष वळविल्याचे समजते.
राजकीय विश्लेषकांच्या मते, मोदीगेट प्रकरण हे दुसरे जैन हवाला प्रकरण ठरण्याची शक्यता आहे, ज्यात ९० च्या दशकात अनेक शक्तिशाली राजकारणी आणि नोकरशहांना मोठा लाभ झालेला होता. या जैन हवाला प्रकरणात किमान दहा केंद्रीय मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता. परंतु काही वर्षांनंतर हे प्रकरण थंड झाले. १९९५ मध्ये जैन हवाला प्रकरण बाहेर आल्यानंतर दिवंगत पी. व्ही. नरसिंहराव यांनी जे काही केले त्याची पुनरावृत्ती व्हावी, असे नरेंद्र मोदी सरकारला अजिबात वाटत नाही.
दरम्यान ललित मोदी यांनी वित्तमंत्री अरुण जेटली यांना आपले लक्ष्य बनविण्याचे ठरविल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळणार आहे असे दिसते. ललित मोदींच्या विरोधात कोणतीही गोष्ट मोदी सरकारने गेल्या वर्षभरात केलेली दिसत नाही.

Web Title: Lalit Modi is absurd; Unrest in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.