लालू प्रसाद यादव साडेतीन वर्षे तुरुंगात; २१ वर्षांपूर्वीच्या चारा घोटाळ्यात दुसरी शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 05:20 AM2018-01-07T05:20:38+5:302018-01-07T05:21:16+5:30

चारा घोटाळ्याशी संबंधित २१ वर्षांपूर्वी दाखल केल्या गेलेल्या फौजदारी खटल्यात येथील सीबीआय विशेष न्यायालयाने बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालू प्रसाद यादव यांना साडेतीन वर्षांचा तुरुंगवास आणि १० लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. चारा घोटाळ्यात लालूंना झालेली ही दुसरी शिक्षा आहे.

Laloo Prasad Yadav imprisoned for three and a half years; Second education in 21 years of fodder scam | लालू प्रसाद यादव साडेतीन वर्षे तुरुंगात; २१ वर्षांपूर्वीच्या चारा घोटाळ्यात दुसरी शिक्षा

लालू प्रसाद यादव साडेतीन वर्षे तुरुंगात; २१ वर्षांपूर्वीच्या चारा घोटाळ्यात दुसरी शिक्षा

Next

रांची : चारा घोटाळ्याशी संबंधित २१ वर्षांपूर्वी दाखल केल्या गेलेल्या फौजदारी खटल्यात येथील सीबीआय विशेष न्यायालयाने बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालू प्रसाद यादव यांना साडेतीन वर्षांचा तुरुंगवास आणि १० लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. चारा घोटाळ्यात लालूंना झालेली ही दुसरी शिक्षा आहे. जामिनासाठी त्यांना आता झारखंड उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे.
या खटल्यात लालूंसह १६ आरोपींना २३ डिसेंबर रोजी दोषी ठरविण्यात आले होते. न्या. शिवपाल सिंग यांनी शनिवारी दुपारी ‘व्हिडीओ कॉन्फरन्स’ माध्यमाने शिक्षा सुनावली. लालूंना भारतीय दंड विधान व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांन्वये सर्व मिळून साडेतीन वर्षांचा कारावास देण्यात आला. दोन्ही कायद्यांखालील शिक्षा एकदमच भोगायच्या असल्याने लालूंचा तुरुंगवास साडेतीन वर्षांचा असेल. याखेरीज प्रत्येक कायद्यान्वये पाच लाख याप्रमाणे एकूण १० लाख रुपयांचा दंडही लालूंना झाला. दंड न भरल्यास आणखी सहा महिने तुरुंगवास भोगावा लागेल. (वृत्तसंस्था)

...तर लालू राजा हरिश्चंद्र ठरले असते!
लालूंना शिक्षा जाहीर झाल्यावर लगेचच पाटण्यात राबडी देवी यांच्या निवासस्थानी ‘राजद’च्या नेत्यांची बैठक झाली. त्यांनी लालूंच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. सन २०१९च्या निवडणुकीत विरोधकांची मोट बांधू शकणारे लालूजी हाच खरा धोका असल्याने मोदी, भाजपा व नितिश कुमार यांनी त्यांच्याविरुद्ध षड्यंत्र रचले असल्याचा आरोप तिथे करण्यात आला.
परंतु याने स्वत: लालू प्रसाद किंवा ‘राजद’ अजिबात झुकणार नाही. तुरुंगात असूनही धसका घेणाºयांना लालूजी बाहेर आल्यावर दुप्पट जोमाने सामोरे जातील, असा विश्वास लालूंचे चिरंजीव तेजस्वी यादव यांनी व्यक्त केला. लालूजींनी भाजपाची तळी उचलून धरली असती तर तेही त्यांच्यासाठी सत्यवचनी राजा हरिश्चंद्रच ठरले असते,
असा टोमणाही त्यांनी लगावला.

पूर्वी बिहारमध्ये व आता झारखंडमध्ये असलेल्या देवघर येथील सरकारी तिजोरीतून, सन १९९१ ते १९९७ या काळात खोटी बिले बनवून फसवणुकीने ८९.२७ लाख रुपये काढून अपहार केल्याच्या संदर्भात हा खटला होता. प्रत्यक्षात चाºयाचा पुरवठा न करताच कंत्राटदारांच्या नावे असे पैसे काढले जात असल्याचे माहीत असूनही मुख्यमंत्री या नात्याने लालूंनी त्याकडे कानाडोळा केला, असा त्यांच्यावर आरोप होता.

या घोटाळ्याच्या एकूण ३३ खटल्यांपैकी सहा खटल्यांमध्ये लालू प्रसाद आरोपी होते. त्यापैकी दोन खटल्यांमध्ये त्यांना शिक्षा झाली आहे. अन्य चार खटल्यांचे कामकाज याच न्यायालयात सुरू आहे. याआधी चैबासा तिजोरीतून झालेल्या ३७.५ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी लालूंना पाच वर्षांची कैद व २५ लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा झाली होती.

सन २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने लालूंना त्या खटल्यात जामीन दिला. पण शिक्षेला स्थगिती न दिली गेल्याने त्यांना
११ वर्षे कोणतीही निवडणूक न लढण्याची अपात्रता लागू झाली. नव्या शिक्षेने त्यांच्या अपात्रतेचा कालावधी आणखी सहा वर्षांनी वाढेल. गेले दोन आठवडे लालू बिरसा मुंडा कारागृहात आहेत. निकालपत्र हाती आल्यावर उच्च न्यायालयात अपील व जामिनासाठी अर्ज करू, असे लालूंच्या वकिलाने सांगितले.

गेले दोन आठवडे लालू येथील बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृहात आहेत. सविस्तर निकालपत्र हाती आल्यावर ते उच्च न्यायालयात अपील करणार आहेत.

भाजपाच्या षड्यंत्रांपुढे झुकण्यापेक्षा मी आयुष्याच्या अखेरपर्यंत सामाजिक न्याय, सलोखा व समानता यासाठी लढा देत राहीन.
- लालू प्रसाद यादव, शिक्षेनंतर केलेले टिष्ट्वट

Web Title: Laloo Prasad Yadav imprisoned for three and a half years; Second education in 21 years of fodder scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.