लालू एम्समधून रिम्समध्ये परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 01:16 AM2018-05-02T01:16:47+5:302018-05-02T01:16:47+5:30
चारा घोटाळ्यासंदर्भात शिक्षा भोगत असलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री यांची मंगळवारी एम्समधून पुन्हा रांची रिम्स रूग्यालयात रवानगी करण्यात आली.
मुंबई : चारा घोटाळ्यासंदर्भात शिक्षा भोगत असलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री यांची मंगळवारी एम्समधून पुन्हा रांची रिम्स रूग्यालयात रवानगी करण्यात आली. लालू प्रसाद यादव यांना प्रकृती अस्वस्थतेच्या कारणास्तव रांची येथील वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले होते. या घटनेमुळे संतप्त झालेल्या राजदच्या कार्यकर्त्यांनी एम्समध्ये गोंधळ घातला.
आपली प्रकृती अद्यापही ठीक नसल्यामुळे आपल्याला रुग्णालयातून सुटी देण्यात येऊ नये, या आशयाचे पत्र लालुप्रसाद यादव यांनी एम्सच्या प्रशासनाला पाठवले होते. मात्र लालूप्रसाद यादव यांची प्रकृती ठीक आहे, असे सांगत एम्स प्रशासनाने आज त्यांना रुग्णालयातून सुटी दिली. लालुप्रसाद यादव यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे, त्यामुळे त्यांना रांची वैद्यकीय महाविद्यालयात पाठवले जात असल्याचे एम्स प्रशासनाने त्यांना सुटी देतांना सांगितले. लालू प्रसाद यादव यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळादरम्यान एम्समध्ये तोडफोड केल्याची घटना ही घडली. या संपूर्ण प्रकरणाची पोलीस तक्रार केली असून सार्वजनिक संप्ततेचे नुकसान केल्याप्रकरणी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.