लालूच गळ्यात पडले, टाळणार कसं? अरविंद केजरीवाल
By Admin | Published: November 23, 2015 01:24 PM2015-11-23T13:24:20+5:302015-11-23T13:24:47+5:30
लालूप्रसाद यादव यांनी माझा हात खेचत स्वत: मला भेट मारली, ते गळ्यात पडल्यावर टाळणार कसं असा सावल विचारत अरविंद केजरीवाल यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - नीतिश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्यात लालू प्रसाद यादव यांची गळाभेट घेतल्यावरून टीकेचा सामना करावा लागलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अखेर याप्रकरणी मौन सोडत 'लालूच माझ्या गळ्यात पडले, त्यांना टाळणार कसं? असा सवाल विचारत सारवासरव करण्याचा प्रयत्न केला. २० नोव्हेंबर रोजी पाटण्यातील गांधी मैदानावर नीतिशकुमार यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी अरविंद केजरीवाल उपस्थित होते. त्यावेळी राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांची गळाभेट घेतल्याने केजरीवाल यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या स्वप्नांता विश्वासघात केला, अशी टीका विरोधकांनी तसेच काही स्वकीयांनीही केली होती. अखेर आज केजरीवाल यांनी या मुद्यावर खुलासा केला आहे.
' मी तेथे नीतिश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी गेलो होतो, लालूंची भेट घेण्यासाठी नव्हे. मंचावर उपस्थित असलेल्या लालूंशी हस्तांदोलन केल्यानंतर त्यांनीच मला ओढून मिठी मारली, मी पुढाकार घेतला नव्हता' असे स्पष्टीकरण केजरीवाल यांनी दिले आहे. तसचे मी आजही लालूंनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात असल्याचे सांगत लालूंच्या दोन मुलांचा बिहारच्या मंत्रीमंडळात झालेला समावेश म्हणजे वंशववादाचे राजकारणा असल्याची टीकाही केजरीवाल यांनी केला.