प्रचारापासून लालूप्रसाद, शरद यादव, पासवान दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2020 01:12 AM2020-10-03T01:12:22+5:302020-10-03T01:12:34+5:30

प्रचारात सहभागी होण्यास राष्ट्रीय जनता दल (राजद)चे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल

Lalu Prasad, Sharad Yadav, Paswan away from the campaign | प्रचारापासून लालूप्रसाद, शरद यादव, पासवान दूर

प्रचारापासून लालूप्रसाद, शरद यादव, पासवान दूर

googlenewsNext

पाटणा : २८ आॅक्टोबरपासून तीन टप्प्यांत पार पडणाऱ्या आगामी बिहार विधानसभा निवडणुकांमधील प्रचारात यावेळी लालूप्रसाद यादव, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान, शरद यादव यांचा विविध कारणांमुळे फारसा सहभाग असणार नाही अशी चिन्हे आहेत. त्यामुळे त्यांची कमतरता तीव्रतेने जाणवत राहणार आहे.

प्रचारात सहभागी होण्यास राष्ट्रीय जनता दल (राजद)चे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल. ती न मिळाल्यास त्यांच्या विशिष्ट शैलीतील भाषणांची उणीव प्रचारात जाणवत राहील. प्रकृती ठीक नसल्याने केंद्रीय मंत्री रामविलास पासवान, माजी केंद्रीय मंत्री शरद यादव हे प्रचारमोहिमेत सहभागी होणार नाहीत.

तेजस्वी यादव यांच्यावर अतिरिक्त भार
राजदच्या प्रचाराचा सर्व भार तेजस्वी यादव यांच्या खांद्यावर असणार आहे. जनता दल यु.तर्फे नितीशकुमार हेच प्रचाराची सर्व धुरा आपल्या खांद्यावर घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हर्च्युअल पद्धतीनेच बिहारच्या विधानसभा निवडणुकांमध्ये संवाद साधतील.

Web Title: Lalu Prasad, Sharad Yadav, Paswan away from the campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.