'आम्ही पती-पत्नीनेही खाते उघडले, पण...'; 15 लाख रुपयांवरून लालूंचा मोदी सरकारवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 06:56 PM2023-09-01T18:56:59+5:302023-09-01T18:58:18+5:30
लालू म्हणाले, या देशात अल्पसंख्यक सुरक्षित नहीत. देशात गरिबी, महागाई वाढत आहे. आपण आज येथे एकत्रित आलो आहोत. सर्वांनाच माहीत असेल की, भाजप किती खोटं बोलून सत्तेवर आला.
INDIA आघाडीमध्ये सामील झालेल्या 28 विरोधी पक्षांचे नेते गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत एकत्र आले आहेत. येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये बैठकिला संबोधित करताना आरजेडीचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. याच वेळी, सर्व पक्ष एकत्रित येत आहेत, याचा आनंद आहे. भाजपला हटवा देश वाचवा, ही लढाई आम्ही सुरुवातीपासूनच लढत आहोत, असेही लालू यादव यावेळी म्हणाले.
लालू म्हणाले, या देशात अल्पसंख्यक सुरक्षित नहीत. देशात गरिबी, महागाई वाढत आहे. आपण आज येथे एकत्रित आलो आहोत. सर्वांनाच माहीत असेल की, भाजप किती खोटं बोलून सत्तेवर आला.
मोदी म्हणाले होते, स्विस बँकेतील पैसा परत आणणार -
भाजपने सत्तेवर येण्यासाठी आपलेही नाव घेतले होते. या लोकांचा पैसा स्वीस बँकेज जमा असल्याचे सांगितले होते. मोदी म्हणाले होते, स्वीस बँकेतला पैसा परत आणणार आणि लोकांना 15-15 लाख रुपये मिळतील.
'आम्ही पती-पत्नीनेही खाते उघडले, पण...'
आपल्या खास अंदाजात निशाणा साधताना लालू म्हणारे, यासाठी मोदींनी लोकांचे जनधन खातेही उघडले होते. आम्ही पती-पत्नीनेही आपे खाते उघडले. पण पैसे आले नाही. काय मिळाले? हे आपल्यालाही माहीत आहे. खरे तर, तो याच लोकांचा पैसा होता.
मोदी जींना सूर्यावर पाठवा : लालू यादव -
यानंतर लालू म्हणाले, चंद्रयानासंदर्भात सध्या बरीच चर्चा होत आहे. चंद्रयानाच्या यशावर आम्हा सर्वांनाच अभिमान आहे. पण, वैज्ञानिकांना विनंती करतो की, मोदी जींना सूर्यावर पाठवा. यासाठी आमच्या शुभेच्छाही आहेत. एवढेच नाही, तर देशात विरोधी पक्षांतील असा एकही नेता नाही, ज्याला तपास यंत्रनांचा सामना करावा लागला नाही, असेही लालू यावेळी म्हणाले.