लालू प्रसाद यादव पायऱ्यावरुन पडले, खांद्याच्या हाडात फ्रॅक्चर, 2 महीने बेड रेस्टचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 09:35 PM2022-07-03T21:35:41+5:302022-07-03T21:35:54+5:30
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव पायऱ्यांवरुन खाली पडल्याची घटना घडली आहे. यात त्यांच्या खांद्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे.
पाटणा: बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव पायऱ्यांवरुन खाली पडल्याची घटना घडली आहे. यात त्यांच्या खांद्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली. लालू यादव यांचा आज एका खासगी रुग्णालयात एमआरआय करण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या खांद्याच्या हाडात हेअरलाइन फ्रॅक्चर झाले असून त्यांना दोन महिने बेड रेस्ट करण्यास सांगितले आहे.
पायऱ्यावरुन पडले
लालू प्रसाद यादव सध्या पाटणा येथील राबडी देवीचे अधिकृत निवासस्थान 10 सर्कुलर रोड येथे राहतात. इथे पायऱ्यावरुन उतरताना त्यांचा तोल गेला. या अपघातात त्यांच्या खांद्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. घाईघाईत त्यांचे एमआयआय पाटणा येथील खासगी रुग्णालयात करण्यात आले. यात त्यांच्या खांद्याच्या हाडात हेअरलाइन फ्रॅक्चर झाल्याचे निष्पन्न झाले.
लालूंना अनेक गंभीर आजार
एका अहवालानुसार, लालू यादव यांना मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, किडनीचे आजार, किडनी स्टोन, तणाव, थॅलेसेमिया, प्रोस्टेट वाढणे, युरिक ऍसिड वाढणे, मेंदूशी संबंधित आजार, कमकुवत प्रतिकारशक्ती, उजव्या खांद्याच्या हाडात समस्या आहे, पायाच्या हाडांची समस्या, डोळ्यांची समस्या, POST AVR 2014 (हृदयाशी संबंधित) यासारख्या समस्या आहेत. या सर्व आजारांपैकी लालूंना किडनीच्या आजाराने सर्वाधिक त्रास झाल्याचे सांगितले जात आहे.