Lalu Prasad Yadav: चारा घोटाळा! लालू यादवांना जामीन मिळणार की तुरुंगात जाणार, आज महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 09:28 AM2022-02-15T09:28:16+5:302022-02-15T09:28:51+5:30

Fodder Scam Update: चारा घोटाळा प्रकरणात आज सीबीआयचे विशेष न्यायालय आपला निकाल सुनावणार आहे.

Lalu Prasad Yadav | Fodder scam | Whether Lalu Yadav will get bail or go to jail, important decision today | Lalu Prasad Yadav: चारा घोटाळा! लालू यादवांना जामीन मिळणार की तुरुंगात जाणार, आज महत्त्वाचा निर्णय

Lalu Prasad Yadav: चारा घोटाळा! लालू यादवांना जामीन मिळणार की तुरुंगात जाणार, आज महत्त्वाचा निर्णय

Next

पाटणा: बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि RJD सुप्रीमो लालू प्रसाद यांच्यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आज चारा घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात सीबीआय विशेष न्यायालय आपला निकाल सुनावणार आहे. या प्रकरणात लालू प्रसाद यादव यांच्यासह एकूण 110 आरोपी आहेत. 

23 वर्षे जुने प्रकरण
चारा घोटाळ्याशी संबंधित या प्रकरणात 29 जानेवारी रोजी बचाव पक्षाच्या वतीने युक्तिवाद पूर्ण केल्यानंतर, सीबीआय विशेष न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. सुमारे 23 वर्षे जुने हे प्रकरण 1990 ते 1995 दरम्यान झारखंडच्या डोरंडा येथे असलेल्या ट्रेझरीमधून 139.35 कोटी रुपये बेकायदेशीरपणे काढण्याबाबतचे आहे.

लालू प्रसाद चार प्रकरणात दोषी
या खटल्यात 7 ऑगस्ट 2021 रोजी फिर्यादी पक्षाच्या वतीने युक्तिवाद पूर्ण झाला, ज्यामध्ये एकूण 575 साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले. तर बचाव पक्षाच्या वतीने 29 जानेवारी रोजी 110 आरोपींचा युक्तिवाद पूर्ण झाला. लालू प्रसाद यांचाही यात समावेश आहे. बचाव पक्षाचे वकील संजय कुमार यांच्या म्हणण्यानुसार, लालू प्रसाद यांना चारा घोटाळ्याच्या 4 प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. यात चाईबासा कोषागारातून बेकायदेशीर पैसे काढण्याचे दोन प्रकरण आहेत, तर लालू प्रसाद यांना देवघर आणि दुमका कोषागार प्रकरणात जामीन मिळाला आहे.

आजच्या निर्णयावर सर्वांची नजर
मात्र, आता केवळ दोरांडा प्रकरणात निर्णय येणे बाकी आहे. दुमका प्रकरणात उच्च न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर लालू सध्या तुरुंगाबाहेर आहेत. मात्र, मंगळवारी ते दोरांडा ट्रेझरी प्रकरणातील निर्णयासंदर्भात रांचीला पोहोचले आहेत. आता मंगळवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाने लालूंच्या अडचणी वाढणार का कमी होणार, हे पाहावे लागेल.

Web Title: Lalu Prasad Yadav | Fodder scam | Whether Lalu Yadav will get bail or go to jail, important decision today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.