Photos: नातीला जवळ घेताच लालूप्रसाद यादव सगळं टेन्शन विसरले, खास फोटो समोर आले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 21:07 IST2023-03-27T21:03:47+5:302023-03-27T21:07:19+5:30
Lalu Prasad Yadav: राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारमधील दिग्गज नेते लालूप्रसाद यादव यांच्या घरी नव्या सदस्याचं आगमन झालं आहे. लालू यादव यांचे धाकटे पुत्र तेजस्वी यांची पत्नी राजश्री हिने आज कन्येला जन्म दिला.

Photos: नातीला जवळ घेताच लालूप्रसाद यादव सगळं टेन्शन विसरले, खास फोटो समोर आले
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारमधील दिग्गज नेते लालूप्रसाद यादव यांच्या घरी नव्या सदस्याचं आगमन झालं आहे. लालू यादव यांचे धाकटे पुत्र तेजस्वी यांची पत्नी राजश्री हिने आज कन्येला जन्म दिला. कन्येच्या जन्मासोबतच संपूर्ण यादव कुटुंबामध्ये आनंदी वातावरण निर्माण झालं आहे. आज बिहारमध्ये छठ सुरू आहे. तसंच नवरात्रीचा उत्सव सुरू आहे. अशा परिस्थितीत लालू कुटुंबीय याला देवाची विशेष कृपा मानत आहे. तसेच संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा मिळत आहेत.
कन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर तेजस्वी यादव यांनी सोशल मीडियावरील विविध प्लॅटफॉर्मवर याची माहिती दिली. त्यानंतर लालूप्रसाद यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा देण्यासाठी आप्तेष्ट आणि मित्रमंडळींची रांग लागली. गेल्या काही काळापासून आजारी असलेले लालूप्रसाद यादव नातीच्या आगमनानंतर स्वत:ला रोखू शकले नाहीत. तेसुद्धा स्वत: नातीला पाहण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले.
त्यानंतर लालूप्रसाद यादव यांनीही नातीसोबतच्या पहिल्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. हे फोटो आता व्हायरल होत आहेत. लालूप्रसाद यादव यांनी नातीला उचलून घेत खेळवले. यावेळी लालूप्रसाद यादव यांच्यासोबत राबडी देवी आणि तेजस्वी यादव हेदेखील उपस्थित होते.
नातीचं स्वागत केल्यानंतर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लालूप्रसाद यादव यांनी लिहिलं की, बाळाला प्रथम जवळ घेणं हा अदभूत, रोमांचक आणि सुखद तसेच मंत्रमुग्ध करणारा क्षण असतो. तुम्ही या मौल्यवान, नव्या निरागस छोट्याशा चेहऱ्यामध्ये अनेक वर्षांपासूनचं प्रेम, त्याग आणि संघर्ष पाहू शकता.
कभी-कभार अनुभूति होती है कि नाती-पोती आपकी आत्मा का भी थोड़ा सा हिस्सा आपसे ले लेते हैं। pic.twitter.com/4IDv4NKt1G
— Lalu Prasad Yadav (@laluprasadrjd) March 27, 2023