लालूप्रसाद यादव तुरुंगात करणार माळीकाम, दर दिवशी मिळणार एवढे वेतन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2018 12:30 PM2018-01-07T12:30:09+5:302018-01-07T12:31:45+5:30

चारा घोटाळ्यात साडे तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या लालूप्रसाद यादव यांची रांची येथील बिरसा मुंडा कारागृहात रवानगी झाली आहे. आता लालूप्रसाद यादव यांना  हजारीबाग येथील खुल्या कारागृहात पाठवण्यात येणार आहे.  तुरुंगात एक कैदी म्हणून लालू यादव यांना माळीकाम देण्यात आले आहे...

Lalu Prasad Yadav will be in jail, gaining money every day, the salaries that would get every day | लालूप्रसाद यादव तुरुंगात करणार माळीकाम, दर दिवशी मिळणार एवढे वेतन

लालूप्रसाद यादव तुरुंगात करणार माळीकाम, दर दिवशी मिळणार एवढे वेतन

Next

पाटणा - चारा घोटाळ्यात साडे तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या लालूप्रसाद यादव यांची रांची येथील बिरसा मुंडा कारागृहात रवानगी झाली आहे. आता लालूप्रसाद यादव यांना  हजारीबाग येथील खुल्या कारागृहात पाठवण्यात येणार आहे.  तुरुंगात एक कैदी म्हणून लालू यादव यांना माळीकाम देण्यात आले असून, त्यासाठी त्यांनी वेतनही मिळणार आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार लालू यादव यांना माळीकामासाठी दररोज 93 रुपये एवढा मेहनताना मिळणार आहे.
 लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा झाल्यानंतर या शिक्षेला आव्हान देण्यासाठी राष्ट्रीय जनता दलाने उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.  चारा घोटाळ्याशी संबंधित २१ वर्षांपूर्वी दाखल केल्या गेलेल्या फौजदारी खटल्यात येथील सीबीआय विशेष न्यायालयाने बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालू प्रसाद यादव यांना शनिवारी साडेतीन वर्षांचा तुरुंगवास आणि १० लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. चारा घोटाळ्यात लालूंना झालेली ही दुसरी शिक्षा आहे.  
या खटल्यात लालूंसह १६ आरोपींना २३ डिसेंबर रोजी दोषी ठरविण्यात आले होते. न्या. शिवपाल सिंग यांनी शनिवारी दुपारी ‘व्हिडीओ कॉन्फरन्स’ माध्यमाने शिक्षा सुनावली. लालूंना भारतीय दंड विधान व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांन्वये सर्व मिळून साडेतीन वर्षांचा कारावास देण्यात आला.  
काय आहे चारा घोटाळा
पूर्वी बिहारमध्ये व आता झारखंडमध्ये असलेल्या देवघर येथील सरकारी तिजोरीतून, सन १९९१ ते १९९७ या काळात खोटी बिले बनवून फसवणुकीने ८९.२७ लाख रुपये काढून अपहार केल्याच्या संदर्भात हा खटला होता. प्रत्यक्षात चाºयाचा पुरवठा न करताच कंत्राटदारांच्या नावे असे पैसे काढले जात असल्याचे माहीत असूनही मुख्यमंत्री या नात्याने लालूंनी त्याकडे कानाडोळा केला, असा त्यांच्यावर आरोप होता. 
या घोटाळ्याच्या एकूण ३३ खटल्यांपैकी सहा खटल्यांमध्ये लालू प्रसाद आरोपी होते. त्यापैकी दोन खटल्यांमध्ये त्यांना शिक्षा झाली आहे. अन्य चार खटल्यांचे कामकाज याच न्यायालयात सुरू आहे. याआधी चैबासा तिजोरीतून झालेल्या ३७.५ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी लालूंना पाच वर्षांची कैद व २५ लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा झाली होती.
सन २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने लालूंना त्या खटल्यात जामीन दिला. पण शिक्षेला स्थगिती न दिली गेल्याने त्यांना ११ वर्षे कोणतीही निवडणूक न लढण्याची अपात्रता लागू झाली. नव्या शिक्षेने त्यांच्या अपात्रतेचा कालावधी आणखी सहा वर्षांनी वाढेल. गेले दोन आठवडे लालू बिरसा मुंडा कारागृहात आहेत. 

Web Title: Lalu Prasad Yadav will be in jail, gaining money every day, the salaries that would get every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.