लालूंना दणका,चारा घोटाळ्याचे चारही खटले चालणार

By admin | Published: May 9, 2017 02:46 AM2017-05-09T02:46:22+5:302017-05-09T02:46:22+5:30

झारखंड न्यायालयाने रद्द ठरविलेल्या कटाच्या आरोपाच्या निर्णयालाच रद्द ठरवित सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांना दणका

Lalu will have four cases of a bribery and fodder scam | लालूंना दणका,चारा घोटाळ्याचे चारही खटले चालणार

लालूंना दणका,चारा घोटाळ्याचे चारही खटले चालणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : झारखंड न्यायालयाने रद्द ठरविलेल्या कटाच्या आरोपाच्या निर्णयालाच रद्द ठरवित सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांना दणका दिला. लालू यादव आणि इतर आरोेपींवर चारा घोटाळ््यातील
सर्व चारही खटले चालवावे आणि संपूर्ण खटला नऊ महिन्यात निकाली काढावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.
झारखंड उच्च न्यायालयाने यादव यांच्यावर असलेला कट केल्याचा आरोप रद्द केला होता. उच्च न्यायालयाचा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. प्रत्येक गुन्ह्यासाठी स्वतंत्र खटला चालेल असे अरूण मिश्रा आणि अमिताव रॉय यांच्या खंडपीठाने म्हटले. लालू प्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री असताना वेगवेगळ््या जिल्ह्यांतील पशू संवंर्धन विभागातून लबाडीने ९०० कोटी रुपये काढण्यात आले होते व त्याच्याशीच हा चारा घोटाळा संबंधित आहे. याच खटल्यात बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा आणि राज्याचे माजी मुख्य सचिव सजल चक्रवर्ती हेदेखील आरोपी आहेत. अनेक खटल्यांपैकी एकात लालू प्रसाद यादव हे दोषी ठरल्यानंतर २०१४ मध्ये झारखंड उच्च न्यायालयाने त्यांच्यावरील खटल्याला स्थगिती दिली होती.
ही स्थगिती रद्द करताना सर्वोच्च न्यायालायने म्हटले की, उच्च न्यायालयाने आपल्या निष्कर्षांमध्ये सुसंगत असले पाहिजे आणि खटल्यातील वेगवेगळ््या आरोपीसंदर्भात वेगवेगळा दृष्टिकोन ठेवू नये. उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात अपील दाखल करायला विलंब केल्याबद्दल केंद्रीय गुप्तचर खात्याला (सीबीआय) सर्वोच्च न्यायालयाने खडसावले. सीबीआयच्या संचालकांनी या महत्वाच्या प्रकरणात लक्ष घालून या खटल्याच्या पाठपुराव्यासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, असेही न्यायालयाने म्हटले.
लालूप्रसाद यादव यांच्याविरोधात दोन कलमांखाली जिल्हा न्यायालयात कार्यवाही सुरूच ठेवण्याची सीबीआयची विनंती १४ नोव्हेंबर, २०१४ रोजी उच्च न्यायालयाने मान्य केली होती तर एकाच गुन्ह्यासाठी व्यक्तीवर दोनवेळा खटला चालवला जाऊ शकत नाही या कारणामुळे इतर आरोप वगळले होते. मुख्यमंत्री असताना यादव यांनी ९६ लाख रुपये लबाडीने काढून घेतल्याच्या संदर्भात हे आरोप आहेत.
राजकारणाचा रस्ता बंद - मोदी
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने लालू प्रसाद यादव यांच्यासाठी राजकारणातील रस्ता आता बंद झाला आहे, अशा शब्दांत भाजपचे नेते आणि बिहारचे विरोधीपक्षनेते सुशीलकुमार मोदी यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले.
चारा घोटाळ््यातील इतर तीन खटल्यात यादव निश्चितपणे दोषी ठरणार व त्यामुळे त्यांच्यावर अनेक वर्षांसाठी निवडणूक बंदी घातली जाईल, असे मोदी म्हणाले.
न्यायालयाचा निर्णय मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लाभदायक आहे. यादव कमकूवत बनतील व ते महाआघाडीला त्रास देण्याच्या अवस्थेत नसतील, असा टोलाही मोदी यांनी लगावला. चारा घोटाळ््यात अगदी सुरवातीला ज्यांनी याचिका केल्या त्यात मोदी एक होते. चार खटल्यांत या न्यायालयांतून त्या न्यायालयांत धाव घेण्याशिवाय यादव यांना हे नऊ महिने दुसरे काही काम नाही, असेही ते म्हणाले.
रॉय यांच्याकडून निर्णयाचे स्वागत
न्यायालयाच्या निर्णयाचे झारखंडचे विधिमंडळ कामकाज मंत्री शरयू रॉय यांनी स्वागत केले. चारा घोटाळ््यात लालू प्रसाद यादव यांची सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणाऱ्यांपैकी एक रॉय होते. १९९६ मध्ये मी आणि माझ्या मित्रांनी जे खटले दाखल केले होते त्यावर आधारीत असा चारा घोटाळ््याचा खटला आहे. या घोटाळ््याची चौकशी करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला दिला होता. सीबीआयने वेगवेगळ््या प्रकरणांत यादव यांच्याविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल केले होते.

Web Title: Lalu will have four cases of a bribery and fodder scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.