तेजप्रताप यादव यांची अचानक प्रकृती बिघडली, श्वास घ्यायला होतोय त्रास; उपचार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 08:31 AM2021-07-07T08:31:49+5:302021-07-07T08:34:35+5:30
Tej Pratap Yadav : तेजप्रताप यांनी ताप आला असून श्वास घ्यायलाही त्रास होत आहे. तेजप्रताप यांनी अलिकडेच रशियन बनावटीची स्पुटनिक लस घेतलेली आहे.
नवी दिल्ली - लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव (Tej Pratap Yadav) यांची तब्येत अचानक बिघडल्याची माहिती मिळत आहे. तेजप्रताप यांनी ताप आला असून श्वास घ्यायलाही त्रास होत आहे. तेजप्रताप यांनी अलिकडेच रशियन बनावटीची स्पुटनिक लस घेतलेली आहे. त्यानंतर ते आजारी पडल्याचं म्हटलं जात आहे. त्यांचे लहान भाऊ तेजस्वी यादव हे तातडीने तेजप्रताप यांच्या सरकारी निवासस्थानी पोहोचलेत. डॉक्टरांची एक टीम तेजप्रताप यांच्यावर घरीच उपचार करत आहे.
तेजप्रताप यांची तब्येत बिघडल्यानंतरही त्यांच्यावर घरीच उपचार केले जात आहेत. जर काही गंभीर परिस्थिती निर्माण झालीच तर रुग्णवाहिकेसह सर्व बाबी तयार ठेवलेल्या आहेत. पण सध्या तरी तेजप्रताप यांच्या तब्येतीला कोणताही धोका नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. भाऊ तेजस्वी यादव मोठ्या भावाच्या सोबतच आहेत. तेजप्रताप यादव यांची प्रकृती आता ठीक आहे. तज्ज्ञांनी दिलेल्य़ा माहितीनुसार, तेजप्रताप यांनी कोरोना लसीचा डोस घेतला होता. त्याचाच हा थोडा परिणाम आहे. त्यामुळेच त्यांना आणि थोडा त्रास होत आहे.
मला लोक दुसरा लालू म्हणतात - तेजप्रताप
सोमवारी आरजेडी पक्षाला पंचवीस वर्ष पूर्ण झाली. यावेळेस तेजप्रताप यांनी कार्यकर्त्यांना ऑनलाईन संबोधितही केलं. यावेळेस त्यांनी राज्य सरकारवर एकीकडे टीका केली तर दुसरीकडे स्वत:ची तुलना वडील लालू यादव यांच्याशी केली. ते म्हणाले की, लोक माझ्या म्हणण्याची खिल्ली उडवतात. हसण्यावर नेतात. माझ्या वडीलांच्या बोलण्यावरही लोक असेच हसायचे. काहींना तर मी दुसरा लालू यादव वाटतो असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus Live Updates : कोरोनाचा वेग मंदावताना काही राज्यांमुळे प्रशासनाच्या चिंतेत भर; रुग्णसंख्येत होतेय सातत्याने वाढ#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindiahttps://t.co/MjYdwWLMRx
— Lokmat (@MiLOKMAT) July 6, 2021