लालू यादव यांची प्रकृती बिघडली; पुढील उपचारासाठी दिल्लीला जाणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 20:36 IST2025-04-02T20:18:08+5:302025-04-02T20:36:07+5:30
लालू यादव यांची प्रकृती दोन दिवसांपासून खराब होती आणि आज ती आणखी बिघडली आहे.

लालू यादव यांची प्रकृती बिघडली; पुढील उपचारासाठी दिल्लीला जाणार
आरजेडी नेते लालू यादव यांची प्रकृती अचानक बिघडली आहे, त्यांना आता पाटण्यातून दिल्लीला जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. लालू यादव घराबाहेर पडले, पण विमानतळावर जाण्याऐवजी ते अचानक पारस रुग्णालयात पोहोचले. तिथून ते विमानतळासाठी रवाना होतील. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी राबडी देवी आणि तेजस्वी यादव आहेत.
लालू यादव यांची प्रकृती दोन दिवसांपासून बिघडली आहे. त्यांची तब्येत शुगरमुळे बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर, राजद कार्यकर्ते आणि समर्थकांनी गर्दी केली.अनेकजण ते बरे होण्याची प्रार्थना करत आहेत.
नरेंद्र मोदी 3 टर्म निवडून आले, आणखी 3 टर्म निवडून येतील; अमित शाहांचे सूचक वक्तव्य
लालू यादव यांना पारस रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळताच, राजदचे ज्येष्ठ नेते अब्दुल बारी सिद्दीकी तिथे पोहोचले. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "तब्येत ठीक नाही. मला वाटतंय की साखरेची पातळी वाढली आहे. बरं वाटत नसल्याने रुग्णालयात आणले आहे. लालू यादव यांना उपचारासाठी दिल्लीला पाठवण्यात येणार आहे.
लालू प्रसाद यादव गेल्या काही दिवसापासून आजारी आहेत. २०२४ मध्ये, त्यांची मुंबईत अँजिओप्लास्टी झाली, त्यानंतर २०२२ मध्ये, त्यांचे सिंगापूरमध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले. त्यांची धाकटी मुलगी रोहिणी आचार्य यांनी त्यांना मूत्रपिंड दान केले. किडनी प्रत्यारोपणानंतर त्यांची प्रकृती सुधारली होती.