बुलेट ट्रेन प्रकल्पाला लालूंचा आक्षेप

By admin | Published: December 22, 2015 04:18 PM2015-12-22T16:18:08+5:302015-12-22T16:18:08+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वकांक्षी मुंबई-अहमदाबाद या बुलेट ट्रेनच्या योजनेवर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांनी आक्षेप घेतला आहे.

Lalu's objection to the bullet train project | बुलेट ट्रेन प्रकल्पाला लालूंचा आक्षेप

बुलेट ट्रेन प्रकल्पाला लालूंचा आक्षेप

Next
>ऑनलाइन लोकमत
पटना, दि. २२ - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वकांक्षी मुंबई-अहमदाबाद या बुलेट ट्रेनच्या योजनेवर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांनी आक्षेप घेतला आहे. देशाच्या विकासाच्या नावाखाली करण्यात येणा-या बुलेट ट्रेनच्या योजनेमुळे देशातील ९० टक्के लोकांचे जीवनमान उंचावण्याऐवजी ते घुंटेल असे लालू प्रसाद यादव म्हटले आहे. 
देशातील पहिल्या ९८ हजार कोटींच्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रकल्पामुळे देशातील ९० टक्के लोकांचे जीवमान कमी होईल. गरिबांना विश्वासात घ्यायच्या आधी विकासाची कामे करण्यात येऊ नयेत, असे लालू प्रसाद यादव यांनी आपल्या ट्विटरवर म्हटले आहे. दरम्यान यासंदर्भात लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठविले असून त्या पत्राची प्रतही त्यांनी आपल्या ट्विटरवर अपलोड केली आहे. 

Web Title: Lalu's objection to the bullet train project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.