लान्सनायक हणमंतप्पांची प्रकृती आणखीं ढासळली

By Admin | Published: February 10, 2016 12:24 PM2016-02-10T12:24:23+5:302016-02-10T18:20:10+5:30

सियाचीनमधल्या हाडे गोठवून टाकणा-या थंडीत पाच दिवस बर्फाखाली राहूनही जिवंत राहिलेले हणमंतप्पा यांची प्रकृती अजूनही नाजूक आहे.

Lancanayak Hanamantappa's condition further deteriorated | लान्सनायक हणमंतप्पांची प्रकृती आणखीं ढासळली

लान्सनायक हणमंतप्पांची प्रकृती आणखीं ढासळली

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - सियाचीनमधल्या हाडे गोठवून टाकणा-या थंडीत पाच दिवस बर्फाखाली राहूनही जिवंत राहिलेले हणमंतप्पा यांची प्रकृती अजूनही नाजूक आहे. दिल्लीतील आरआर लष्करी रुग्णालयाने हणमंतप्पांच्या प्रकृतीसंबंधीच्या ताज्या मेडिकल बुलेटिनमध्ये त्यांची प्रकृती अजून खालावल्याचे म्हटले आहे. 
तज्ञ डॉक्टरांचे पथक हणमंतप्पांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहे. मात्र अजूनही त्यांनी औषधोपचाराला प्रतिसाद दिलेला नाही. २५ फूट बर्फाखाली हणमंतप्पांचे जिवंत सापडणे हा एक चमत्कार मानला जात आहे. हणमंतप्पांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी देशभरात प्रार्थना सुरु आहेत.
सियाचीनमध्ये उणे ४५ अंश तापमानात २५ फूट बर्फाच्या ढिगा-याखाली सापडूनही ६ दिवस जिवंत राहिलेले लान्सनायक हनुमंतअप्पा यांच्यावर सध्या दिल्लीतील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र ते अद्यापही कोमात असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून पुढील ४८ तास त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत' अशी माहिती रुग्णालयातर्फे जारी करण्यात आलेल्या बुलेटिनमध्ये देण्यात आली आहे. 
सियाचीन ग्लेसियरमध्ये बेपत्ता जवानांचा शोध घेणाऱ्या पथकाने बर्फ कापून चालविलेल्या शोधमोहिमेला सोमवारी रात्री उशिरा यश आले. तब्बल ६ दिवसानंतर हनुमंतअप्पा यांना जिवंत बाहेर काढण्यात आले खरे, मात्र त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने खास एअर अ‍ॅम्ब्युलन्सने दिल्लीच्या रिसर्च अँड रेफेरल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तज्ञ डॉक्टरांचे पथक हनमंतअप्पा यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहे. आज सकाळी लष्करप्रमुख दलबीर सिंग सुहाग यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. 
आज सकाळी रुग्णालयातर्फे जारी करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये त्यांच्या प्रकृतीविषयी महिती देण्यात आली. ' त्यांची किडनी व यकृत काम करत नसून त्यांचा रक्तदाब वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे या बुलेटिनमध्ये नमूद करण्यात आले. तर लान्सनायक हनुमंतअप्पा यांना लष्कराच्या रुग्णालयात हलविल्याची माहिती कळताच काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने तेथे जाऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली. हनुमंतअप्पा हे असामान्य जवान असून त्यांनी दुर्दम्य धैर्य आणि संयमाचे दर्शन घडविले आहे, या शब्दांत मोदींनी त्यांची प्रशंसा केली.
दरम्यान हनुमंतअप्पा यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी यासाठी देशभरातील नागरिक प्रार्थना करत असून वाराणसीतील गंगा घाट येथे विशेष आरती करण्यात आली. तर मुंबईच्या डबेवाल्यांनीही हनुमंतअप्पा यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी व त्यांना उदंड आयुष्य मिळावे अशी प्रार्थना केली. अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, आमिर खान याच्यासह अनेक सेलिब्रिटींनीही त्यांच्यासाठी प्रार्थना केली आहे. 
 
 
 
 
बिग बी अमिताभ बच्चन यांनी लान्सनायक हनुमंतअप्पा यांच्या धैर्याचे कौतुक करत त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली.
 
 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही हनुमंतअप्पा यांच्या शौर्याला केला सलाम.

आमिर खाननेही केली प्रार्थना

Web Title: Lancanayak Hanamantappa's condition further deteriorated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.