पाकिस्तानच्या गोळीबारात लान्स नायक शहीद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 10:24 AM2020-10-01T10:24:23+5:302020-10-01T10:25:37+5:30
Pakistan ceasefire violation सैन्यातर्फे शहीद जवानाला मानवंदना देण्यात आली आहे. पाकिस्तानकडून सुरु असलेल्या फायरिंगमध्ये लान्स नायक करनल सिंह यांनी बलिदान दिले आहे.
एकीकडे चीनच्या सीमेवर तनाव असताना दुसरीकडे पाकिस्तानकडून कुरापती सुरुच आहेत. शस्त्रसंधीचे उल्लंघन करत केलेल्या गोळीबारात भारताचे लान्स नायक शहीद झाले आहेत. यानंतर भारतीय जवानांनीहीपाकिस्तानला जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे.
गुरुवारी सकाळपासून पाकिस्तानकडून कृष्णा घाटीमध्ये जोरदार गोळीबार केला जात आहे. यामध्ये लान्स नायक करनेल सिंह शहीद झाले आहेत. तर अन्य एक जवान जखमी झाला आहे. या जखमी जवानाचे नाव विरेंद्र सिंह आहे. त्याच्या डोळ्याला मार बसला आहे. विरेंद्र सिंह यांना राजौरीच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
GOC @ Whiteknight_IA & all ranks salute the braveheart Lance Naik Karnail Singh, who made the supreme sacrifice in Krishna Ghati Sector on the night of 30 Sep 20 & offer condolences to his family. @adgpi@NorthernComd_IApic.twitter.com/oecktVdSUt
— White Knight Corps (@Whiteknight_IA) October 1, 2020
सैन्यातर्फे शहीद जवानाला मानवंदना देण्यात आली आहे. पाकिस्तानकडून सुरु असलेल्या फायरिंगमध्ये लान्स नायक करनल सिंह यांनी बलिदान दिले आहे. आम्ही त्याच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहोत, असे सैन्याने म्हटले आहे.
पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. सोमवारी पाकिस्तानच्या राजौरीच्या नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार केला होता. या काळात पाकिस्तानकडून मोर्टार डागण्यात आले होते. यावर भारताकडूनही जोरदार प्रत्यूत्तर देण्यात आले होते.