जिल्हा प्रशासनाच्या जागेवर अतिक्रमण, पत्नीने पतीला पाठविली नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 01:27 PM2020-01-21T13:27:20+5:302020-01-21T13:35:55+5:30
अनु चौधरी यांची 2017 मध्ये सरपंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अहमदाबाद : बेकायदेशीर ताब्यात असलेल्या जमीन प्रकरणी गुजरातमधील एका सरपंच महिलेने आपल्या पतीला नोटीस पाठविली आहे. बनासकांठामधील वडगाव तालुक्यातील थालवडा येथील सरपंच अनु चौधरी (35) यांनी आपले पती दिनेश चौधरी (40) यांना जमीन अतिक्रमण प्रकरणी कारवाई करण्याची नोटीस पाठविली आहे. दिनेश चौधरी यांच्यावर जनावरांना चरण्यासाठी असलेली राखीव जमीन त्यांनी ताब्यात घेतल्याचा आरोप आहे.
अनु चौधरी यांची 2017 मध्ये सरपंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याप्रकरणी अनु चौधरी यांनी सांगितले की, नोटीस पाठविण्याची कारवाई पतीच्याविरोधात आलेल्या तक्रारीच्या आधारावर करण्यात आली आहे. डिसेंबर 2018 मध्ये पहिल्यांदा नोटीस पाठविण्यात आली होती. मात्र, पतीने ही जमीन खाली केली नाही. त्यानंतर त्यांना 12 जानेवारी 2019 मध्ये दुसऱ्यांदा नोटीस पाठविली होती.
याप्रकरणी सरपंचानी जिल्हा प्रशासनाला दुर्लक्षित केले होते, असा आरोप वडगावच्या तलाठी वर्षा चौधरी यांनी सरपंच अनु चौधरी यांच्यावर केला आहे. वर्षा चौधरी यांनी सांगितले की, अनु चौधरी यांच्याकडे या जमिनीबद्दल अनेक तक्रारी आल्या होत्या. यानंतर त्यांनी नोटीस पाठविली. याशिवाय, या जमिनीवरील अतिक्रमणाबाबत अनेक तक्रारी दाखल केल्या होत्या, असे या गावातील एका कार्यकर्ता हसमुख राठोड यांनी सांगितले.
हसमुख राठोड म्हणाले, "सरपंचांनी नोटीस पाठविली आहे. मात्र, याप्रकरणी त्यांच्या पतीवर जिल्हा प्रशासन कारवाई करवाई करणार की नाही, याकडे पाहावे लागेल." तर, दुसरीकडे पती दिनेश चौधरी यांनी या प्रकरणात सर्वकाही कायद्यानुसार केल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, "मला जमीन खाली करण्यास सांगितले आहे, त्यानुसार मी करणार आहे. ही जमीन 24 फेब्रुवारीच्या आधी खाली करण्यात येईल."
आणखी बातम्या...
सावधान! चीनमध्ये वेगात पसरतोय 'कोरोन वायरस'चा धोका; संपूर्ण देशात अलर्ट
बँक ऑफ महाराष्ट्रची कॉर्पोरेट, कृषी कर्जाची डोकेदुखी कायम..
साईबाबा बीडमध्ये नोकरीला होते, कर्मभूमी म्हणून १०० कोटींचा निधी द्या; बीडकरांची मागणी
मुस्लिमांच्या आग्रहामुळे सेनेशी आघाडी; चव्हाणांचा वक्तव्यावरून भाजपची शिवसेनेवर टीका