उत्तराखंडमध्ये भूस्खलनामुळे 7 मजुरांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 03:30 PM2018-12-21T15:30:04+5:302018-12-21T16:17:05+5:30
उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथे शुक्रवारी (21 डिसेंबर) भूस्खलन झाल्याची घटना समोर आली आहे. ढिगाऱ्याखाली दबून 7 मजुरांचा मृत्यू झाला आहे.
देहरादून - उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथे शुक्रवारी (21 डिसेंबर) भूस्खलन झाल्याची घटना समोर आली आहे. ढिगाऱ्याखाली दबून 7 मजुरांचा मृत्यू झाला आहे. केदारनाथ जवळील महामार्गावर ही दुर्घटना घडली असून आणखी काही मजूर अडकले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या पाच मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्याचं काम सुरू असताना भूस्खलन झाले. मजूर काम करत असताना मोठा भाग कोसल्याने ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखालून मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे.
#UPDATE: Rudraprayag DM Mangesh Ghildiyal on the incident where rocks fell on labourers on Kedarnath roadway near Banswara,"As per the contractor there were 23 labourers and of them 12 escaped unhurt. A magisterial inquiry will reveal the reason behind the incident." https://t.co/VbFoMl3QhA
— ANI (@ANI) December 21, 2018
Uttarakhand: According to Rudraprayag DM Mangesh Ghildiyal, 7 bodies have been recovered from the site of an accident where rocks fell on labourers on Kedarnath roadway near Rudraprayag's Banswara. 5 labourers have been critically injured in the incident. Rescue work is underway. pic.twitter.com/ofmPOrjw0U
— ANI (@ANI) December 21, 2018