स्पाईस जेटच्या विमानाचे टायरशिवाय लँण्डींग
By admin | Published: March 2, 2016 07:50 PM2016-03-02T19:50:56+5:302016-03-02T19:50:56+5:30
स्वस्त हवाई प्रवासाचा पर्याय देणा-या स्पाईस जेटच्या प्रवासी विमानाने मंगळवारी टायरशिवाय लँण्डीग केल्याची धक्कादायक घटना घडली.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - स्वस्त हवाई प्रवासाचा पर्याय देणा-या स्पाईस जेटच्या प्रवासी विमानाने मंगळवारी टायरशिवाय लँण्डीग केल्याची धक्कादायक घटना घडली. वैमानिकाने प्रसंगावधान राखून सुखरुपरित्या विमानाचे लँण्डीग केल्याने मोठी दुर्घटना टळली.
या विमानामध्ये २११ प्रवाशांसह सात क्रू सदस्य होते. मंगळवारी रात्री साडेआठ वाजता स्पाईस जेटच्या विमानाने बंगळुरु विमानतळावरुन कोलकाताला जाण्यासाठी टेकऑफ केले. त्यावेळी विमानतळावरील ग्राऊंड स्टाफला विमानाचे टायर फुटल्याचे लक्षात आले.
त्यांनी लगेचच हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने लगेच ही बाब वैमानिकाच्या लक्षात आणून दिली. वैमानिकाने कोलकाता विमानतळावर टायरशिवाय सुखरुपरित्या विमानाचे लँण्डीग केले.
मागच्यावर्षी मे महिन्यात स्पाईस जेटच्या मुंबई-गोवा विमानाचेही अशाच प्रकारे टायर फुटले होते. या विमानात १४६ प्रवासी होते. मात्र गोव्याच्या दाबोलिम विमानतळावर विमानाचे सुखरुप लँण्डींग झाले होते.