विदेशात असलात तरी वापरता येणार घरचा लँडलाइन फोन
By Admin | Published: March 18, 2016 02:52 PM2016-03-18T14:52:03+5:302016-03-18T14:52:03+5:30
बीएसएनलचे ग्राहक विदेशात असताना अॅपच्या माध्यमातून भारतातला लँडलाइन वापरू शकतिल आणि इंटरनॅशनलचा कॉल रेट न पडता स्थानिक दरात संवाद साधू शकतिल
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - बीएसएनलचे ग्राहक विदेशात असताना अॅपच्या माध्यमातून भारतातला लँडलाइन वापरू शकतिल आणि इंटरनॅशनलचा कॉल रेट न पडता स्थानिक दरात संवाद साधू शकतिल असे जाहीर करण्यात आले आहे.
बीएसएनलने फक्स्ड मोबाईल टेलिफोनी (FMT) हे अॅप लाँच केले आहे, जे 2 एप्रिल रोजी कार्यान्वित होणार आहे. यासाटी मासिक शुल्क निश्चित करण्यात येत असल्याचे बीएसनएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी सांगितले.
यामुळे FMT च्या माध्यमातून लँडलाइनचे रुपांतर मोबाइलमध्ये होणार असल्याचे श्रीवास्तव म्हणाले. बीएसएनएलच्या या अॅपमुळे फिक्स्ड लाइन व मोबाइल फोन कनेक्ट होणार आहेत. लँडलाइन फोनधारकांना एसएमएसची सुविधा देण्याचाही प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
या बदलांसाठी सध्याची नेटवर्क यंत्रणा बदलण्यात येत असून नवीन यंत्रणा 2 एप्रिल रोजी कार्यान्वित होणार आहे.
दरम्यान, बीएसएनएलने जम्मूतल्या कटरा येथे वाय-फाय हॉट स्पॉट सुरू केला आहे. हा एका वर्षातला एक हजारावा हॉटस्पॉट आहे.