Landslide in Ladakh: लडाखमध्ये भूस्खलन; लष्कराच्या 3 वाहनांना अपघात, 6 जवान शहीद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 03:05 PM2022-10-07T15:05:39+5:302022-10-07T15:06:27+5:30
Landslide in Ladakh: लडाखमध्ये भूस्खलनामुळे मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे.
Landslide in Ladakh: लडाखमध्ये भूस्खलनामुळे मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात लष्कराच्या 6 जवानांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे भूस्खलन इतके धोकादायक होते की लष्कराच्या ताफ्यातील 3 वाहनांना त्याचा फटका बसला. अपघाताबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, या भागात दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात.
याआधी ऑगस्टमध्ये उत्तराखंडमधील उत्तरकाशीमधील भैरव घाटी आणि नेलंग दरम्यान झालेल्या भूस्खलनात एक जवान शहीद झाला होता. या गस्ती पथकातील एक डॉक्टरही जखमी झाला आहे. इतर काही जवानांना वाचवण्यात यश आले आहे.
उत्तराखंडमध्ये हिमस्खलनानंतर शोधमोहीम सुरूच
दुसरीकडे, उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये आणखी तीन जणांचे मृतदेह सापडल्याने हिमस्खलनात मृतांची संख्या 19 वर पोहोचली आहे. नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग (NIM) ने शुक्रवारी ही माहिती दिली. अधिका-यांनी सांगितले की, शोध मोहिमेत मदत करण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या (IAF) दोन हेलिकॉप्टरने उत्तराखंडमधील हर्षिल येथून उड्डाण केले. मंगळवारी एनआयएमचे गिर्यारोहक गिर्यारोहण करून परतत असताना 17 हजार फूट उंचीवर असलेल्या द्रौपदीच्या दांडा-2 शिखराला हिमस्खलनाचा तडाखा बसला होता.
Uttarkashi Avalanche | Four more bodies of trainee mountaineers brought from Harsil to the district hospital of Uttarkashi.
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 7, 2022
Till now, 19 bodies have been recovered. #Uttarakhandpic.twitter.com/RCPu7jaixX
19 मृतदेह बाहेर काढले
एनआयएमने सांगितले की, हिमस्खलन झालेल्या ठिकाणाहून गुरुवारी संध्याकाळी आणखी तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले असून आतापर्यंत 19 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. संस्थेच्या म्हणण्यानुसार, यापैकी 17 मृतदेह प्रशिक्षणार्थींचे आहेत, तर दोन मृतदेह प्रशिक्षकांचे आहेत. 10 प्रशिक्षणार्थी अद्याप बेपत्ता आहेत. आर्मी, एअर फोर्स, एनआयएम, इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस (ITBP), हाय अल्टिट्यूड वॉरफेअर स्कूल (J&K), स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स आणि जिल्हा प्रशासन शोध मोहिमेत गुंतले आहेत.