जम्मू-काश्मीरमधल्या रामबाणमध्ये भूस्खलन, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
By admin | Published: May 12, 2016 10:48 PM2016-05-12T22:48:10+5:302016-05-12T22:48:10+5:30
रामबाण जिल्ह्यात अचानक आलेल्या पुरामुळे भूस्खलन झालं आहे. या भूस्खलनात तीन विद्यार्थी गाडले गेले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
जम्मू-काश्मीर, दि. 12- रामबाण जिल्ह्यात अचानक आलेल्या पुरामुळे भूस्खलन झालं आहे. या भूस्खलनात तीन विद्यार्थी गाडले गेले आहेत. दोन विद्यार्थ्यांचे मृतदेह ढिगा-याखालून काढण्यात पोलिसांना यश आलं आहे. तिस-या विद्यार्थ्याच्या मृतदेहाचा पोलीस कसोशीनं तपास करत आहेत.
राकेश कुमार (14), पायल (14), शिवाली देवी (6) हे विद्यार्थ्यी शाळेतून घराच्या दिशेनं जात होते. त्याचवेळी चकवाल मोर या भागात अचानक आलेल्या पुरामुळे भूस्खलन झाले आणि तीन विद्यार्थी गाडले गेले. राकेश आणि शिवालीचे मृतदेह पोलिसांना सापडले आहेत. पायलच्या मृतदेहाचा पोलीस शोध घेत आहेत.
पुरामुळे शहरात जनजीवन विस्कळीत झालं. अनेक घरं आणि ऑफिसात पाणी शिरलं आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. उदमपूर आणि कुड भागात आलेल्या पुरामुळेच हे भूस्खलन झाल्याची माहिती मिळते आहे.