मोठी दुर्घटना: भूस्खलन होऊन दरडीखाली गाडली गेली बससह अनेक वाहने, ४० जण बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 02:37 PM2021-08-11T14:37:49+5:302021-08-11T14:40:15+5:30
Landslide in Kinnaur: हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्ह्यातील निगुलसेरी येथे राष्ट्रीय महामार्ग-५ वरील चील जंगलजवळ भूस्खलन होऊन मोठी दुर्घटना घडली आहे.
किन्नौर (हिमाचल प्रदेश) - हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्ह्यातील निगुलसेरी येथे राष्ट्रीय महामार्ग-५ वरील चील जंगलजवळ भूस्खलन होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. (Landslide in Kinnaur)भूस्खलन होऊन कोसळलेल्या दरडीखाली एचआरटीसीची एक बस सापडली असून, तेथून जात असलेल्या अनेक गाड्याही ढिगाऱ्याखाली सापडल्या आहेत. दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासन आणि पोलिसांचे पथक घटनास्थळावर रवाना झाले आहे. ( Landslide buried several vehicles including a bus, 40 people missing)
दुर्घटनेमध्ये दरडीखाली सापडलेली बस किन्नौर जिल्ह्यातील मुरंग-हरिद्वार मार्गावरील असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र प्रशासनाकडून याला कुठलाही दुजोरा देण्यात आलेला नाही. भूस्खलनादरम्यान, कड्यावरून मोठ्या प्रमाणात दगडमातीचा ढिगारा खाली आल्याने अनेक वाहने खाली दबली आहेत. एचआरटीसीच्या बसमध्ये किती प्रवासी होते हे, समजू शकलेले नाही. अपघात झाल्यानंतर बस कड्यावरून खाली कोसळल्याचे सांगण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
Himachal Pradesh | A landslide occurred on the Reckong Peo-Shimla highway in Kinnaur district today
— ANI (@ANI) August 11, 2021
One truck and one HRTC bus reportedly came under the rubble. Many people reported trapped. Indo-Tibetan Border Police (ITBP) teams rushed for rescue: ITBP pic.twitter.com/GH4iAAsScX
समोर येत असलेल्या माहितीनुसार बसच्या ड्रायव्हरने घटनास्थळावरून माहिती दिली आहे की, या बसमधून ३५ ते ४० जण प्रवास करत होते. किन्नौरमधील भावनगर येथे हा अपघात झाला आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी या दुर्घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र याबाबत केवळ काही माहिती मिळाली आहे. बससोबतच काही इतर वाहनेही खाली दबली आहेत. एनडीआरएफच्या टीमलाही अलर्टवर ठेवण्यात आले आहे. तसेच पोलीस आणि प्रशासनालाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, किन्नौर येथील सांगला-छितकूल मार्गावर २५ जुलै रोजी भूस्थलन होऊन मोठी दुर्घटना घडली होती. येथे पर्वतावरून दगड पर्यटकांच्या वाहनावर कोसळून झालेल्या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला होता. तर तीन जण जखमी झाले होते. गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशमध्ये सातत्याने भूस्खलनाच्या घटना घडत आहेत.