ट्रॅफीक गार्डनजवळील ओटे अखेर तोडले जमिनीचे सपाटीकरण : गणेश कॉलनी रस्त्यावरील हॉकर्सचे आज स्थलांतर
By admin | Published: May 22, 2016 07:40 PM2016-05-22T19:40:12+5:302016-05-22T19:40:12+5:30
जळगाव : कोर्ट चौक ते गणेश कॉलनी आणि टॉवर चौक ते नेहरू चौक दरम्यानच्या हॉकर्सच्या स्थलांतरासाठी ट्रॅफीक गार्डन जवळील सिव्हीक सेंटरच्या जागेवरील ओटे अखेर रविवारी मनपाच्या पथकाने तोडून जमिनीचे सपाटीकरण केले. त्यामुळे सोमवारी या जागेवर हॉकर्सचे स्थलांतर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Next
ज गाव : कोर्ट चौक ते गणेश कॉलनी आणि टॉवर चौक ते नेहरू चौक दरम्यानच्या हॉकर्सच्या स्थलांतरासाठी ट्रॅफीक गार्डन जवळील सिव्हीक सेंटरच्या जागेवरील ओटे अखेर रविवारी मनपाच्या पथकाने तोडून जमिनीचे सपाटीकरण केले. त्यामुळे सोमवारी या जागेवर हॉकर्सचे स्थलांतर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आरोग्याधिकारी उदय पाटील यांच्यासह मनपाचे कर्मचारी तसेच अतिक्रमण विभागाचे दोन कर्मचारी सकाळी साडेसात वाजता या ठिकाणी पोहोचले. १ जेसीबी व ४ डंपर यांच्या सहाय्याने हे ओटे तोडण्यात आले. त्यास कुणाचाही विरोध झाला नसल्याचे सांगण्यात आले. मनपाने कोर्ट चौक ते गणेश कॉलनी आणि टॉवर चौक ते नेहरू चौक दरम्यानच्या हॉकर्सच्या स्थलांतरासाठी ट्रॅफीक गार्डन जवळील सिव्हीक सेंटरच्या जागेचा पर्याय निित केला आहे. मात्र या जागेवरील ओटे तोडलेले नसल्याने अडचण निर्माण झाली होती. याबाबत मनपाच्या स्थायी समितीच्या सभेत जोरदार चर्चा झाली होती. हॉकर्स आपल्या मागण्यांबाबत पालकमंत्री, आमदारांना भेटतात. आमदार त्यांची दिशाभूल करतात. हे थांबायचे असेल तर सिव्हीक सेंटरमधील ओटे तातडीने तोडून तेथे हॉकर्सचे स्थलांतर केले जावे, अशी मागणी सदस्यांनी केली होती. त्यावर रविवारी २२ मे रोजी ओटे तोडावेत व सोमवारपासून तेथे हॉकर्सचे स्थलांतर करण्यात यावे, असे आदेश या समितीचे सभापती नितीन बरडे यांनी दिले होते. त्यानुसार रविवारी ही कारवाई करण्यात आली. -------आज स्थलांतर शक्यया जागेवरील ओटे तोडल्याने हॉकर्ससाठी पे आखून देऊन त्यांचे स्थलांतर या जागेत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार सोमवारी हे स्थलांतर केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.