बद्रिनाथ मार्गावर भूस्खलन; १५ हजार भाविक अडकले
By admin | Published: May 20, 2017 05:40 AM2017-05-20T05:40:06+5:302017-05-20T05:40:06+5:30
उत्तराखंडमध्ये बद्रिनाथ मार्गावर विष्णुप्रयाग येथे शुक्रवारी भूस्खलन झाल्याने १५ हजार भाविक अडकले आहेत. चमोली जिल्ह्यात सतत पाऊस पडत असून बद्रिनाथकडे
बद्रिनाथ : उत्तराखंडमध्ये बद्रिनाथ मार्गावर विष्णुप्रयाग येथे शुक्रवारी भूस्खलन झाल्याने १५ हजार भाविक अडकले आहेत. चमोली जिल्ह्यात सतत पाऊस पडत असून बद्रिनाथकडे जाणाऱ्या भाविकांसाठी त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत.
विष्णुप्रयागच्या जवळ हाथीपहाड येथे भूस्खलनानंतर हा महामार्ग पूर्ण बंद झाला आहे. या रस्त्याचा ५० मीटर भाग खचला आहे. प्रशासनाने भाविकांना रस्त्यातच रोखले आहे. हाथीपहाडच्या दोन्ही बाजंूना ५००हून अधिक वाहने अडकली आहेत. बद्रिनाथकडे जाणाऱ्या भाविकांना जोशी मठ, पीपलकोटी, चमोली येथे थांबविण्यात आले आहे. बद्रिनाथच्या बाजूने अडकलेल्या यात्रेकरूंसाठी गोविंदघाट गुरुद्वारा येथे राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
चमोलीचे जिल्हाधिकारी आशिष जोशी यांनी सांगितले, दगडमातीचे ढीग हलविण्याचे काम व इतर काम सुरू आहे. महामार्ग शनिवारी सुरू होऊ शकतो.