वैष्णो देवी यात्रा मार्गावर भूस्खलन; भाविक ठार, व्हिडीओ आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 03:18 PM2024-09-02T15:18:11+5:302024-09-02T15:20:38+5:30

Vaishno Devi Landslide Video : वैष्णो देवी यात्रा मार्गावर दरड कोसळल्याची दुर्घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून, यात एक भाविक ठार झाला आहे. 

Landslides on Vaishno Devi Yatra route; Devotee killed, video surfaced | वैष्णो देवी यात्रा मार्गावर भूस्खलन; भाविक ठार, व्हिडीओ आला समोर

वैष्णो देवी यात्रा मार्गावर भूस्खलन; भाविक ठार, व्हिडीओ आला समोर

Vaishno Devi Landslide News : माता वैष्णो देवी यात्रेदरम्यान एक दुर्घटना घडली आहे. यात्रा मार्गावर भूस्खलन झाले असून, एका भाविकाचा मृत्यू झाला आहे, तर एक भाविक गंभीर जखमी झाला आहे. भूस्खलनाचा व्हिडीओही समोर आला आहे. 

दुर्घटना घडल्याची माहिती मिळाल्यानंतर मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे. जखमी झालेल्या भाविकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, प्रकृती स्थिर असल्याचे प्रशासनाने सांगितले. 

प्रशासनाने मार्ग केला बंद

यात्रा मार्गात भूस्खलन झाल्याच्या घटनेनंतर प्रशासनाने भाविकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाने ये-जा बंद केली असून, मार्गावरील मलबा तातडीने उचलण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. 

भूस्खलन झाल्याने कोसळले छत

या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून, यात वैष्णो देवी मार्गावर मातीचा ढीग पडल्याचे दिसत आहे. दरड मार्गावरील छतावर कोसळली. त्यामुळे छताचेही मोठे नुकसान झाले आहे. व्हिडीओमध्ये मार्ग बंद झाल्याचे दिसत आहे. 

लाखो लोक येतात वैष्णो देवीच्या दर्शनाला

भारतातून आणि परदेशातून दरवर्षी लाखो भाविक वैष्णो देवीच्या दर्शनाला येतात. २०२३ मध्ये ९३.५० लाख भाविकांनी वैष्णो देवीचे दर्शन घेतले. 

जम्मूमधील रियासी जिल्ह्यात असलेल्या त्रिकूट डोंगरामध्ये वैष्णो देवी मंदिर आहे. १०८ शक्तिपीठांपैकी आहे. सर्वाधिक भाविक दर्शनाला येणाऱ्या देवस्थानांपैकी हे एक आहे. नवरात्री सारख्या उत्सवावेळी इथे भाविकांची मोठी गर्दी असते. 

Web Title: Landslides on Vaishno Devi Yatra route; Devotee killed, video surfaced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.