अदानी समूहालाच वीज प्रकल्पाचे काम द्या! PM मोदींनी टाकला श्रीलंकेवर दबाव? अधिकाऱ्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 11:22 AM2022-06-13T11:22:48+5:302022-06-13T11:38:25+5:30

Adani Group And PM Modi: श्रीलंकन अधिकाऱ्याने केलेला दावा राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी फेटाळून लावला आहे.

lanka official claims pm modi wanted adani to get project but sri lankan president gotabaya rajapaksa denied | अदानी समूहालाच वीज प्रकल्पाचे काम द्या! PM मोदींनी टाकला श्रीलंकेवर दबाव? अधिकाऱ्याचा दावा

अदानी समूहालाच वीज प्रकल्पाचे काम द्या! PM मोदींनी टाकला श्रीलंकेवर दबाव? अधिकाऱ्याचा दावा

Next

नवी दिल्ली: श्रीलंका मोठ्या आर्थिक संकटात असताना भारत सर्वतोपरि मदत करत आहे. मात्र, श्रीलंकेतील एका अधिकाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर एक मोठा आरोप केला आहे. श्रीलंकेतील ऊर्जा प्रकल्पाचे काम अदानी समूहालाच द्यावे, यासाठी पंतप्रधान मोदी श्रीलंकेच्या राष्ट्रपतींवर मोठा दबाव आणत असल्याचा दावा या अधिकाऱ्याने केला आहे. 

भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अदानी समूहाला ऊर्जा प्रकल्प देण्यासाठी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्यावर कथितपणे दबाव आणला होता. मात्र या विधानानंतर वाद वाढल्याने एका दिवसानंतर हे विधान संबंधित अधिकाऱ्याने मागे घेतले आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती राजपक्षे यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. श्रीलंकन अधिकाऱ्याने केलेला आणि नंतर मागे घेतलेला हा दावा देशाच्या उत्तरेला असणाऱ्या मन्नार जिल्ह्यातील ५००-मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्पाशी संबंधित आहे. 

मला सांगितले की मोदींच्या दबावाखाली आहे

हा दावा करणारे अधिकारी आहेत, श्रीलंकेच्या सिलोन इलेक्ट्रिसिटी बोर्डाचे अध्यक्ष, एम.एम.सी. फर्डिनांडो. फर्डिनांडो यांनी शुक्रवारी कोलंबो येथील संसदीय समितीसमोर हजेरी लावली. राष्ट्रपती राजपक्षे यांच्याशी झालेल्या संभाषणात राष्ट्रपतींनी अदानी समूहाचा प्रकल्प देशात आणण्यासाठी मोदींनी दबाव आणत असल्याचे आपल्याला सांगितल्याचा दावा फर्डिनांडो यांनी केला. राजपक्षे यांनी, मला सांगितले की मी मोदींच्या दबावाखाली आहे. हा प्रकल्प भारतीय कंपनीला देण्यास राष्ट्रपतींनी निर्देश दिल्याचे या वरिष्ठ अधिकाऱ्याने समितीला सांगितले. अदानींना प्रकल्प मिळावा अशी पंतप्रधानांची इच्छा होती, असं राष्ट्रपतींनी आपल्याला सांगितल्याचा दावाही या अधिकाऱ्याने समितीपुढे केला.

दरम्यान, फार्डिनांडो यांनी केलेले हे आरोप राजपक्षे यांनी फेटाळून लावले आहे. सीईबीने यापूर्वी कधीही सरकारी स्तरावर नियमबाह्य आणि अनपेक्षित प्रस्ताव दिलेले नाहीत, असे राजपक्षे म्हणाले. राष्ट्रपती राजपक्षे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर राष्ट्रपतींनी फर्डिनांडो यांना चर्चेसाठी बोलावले होते. त्यावेळी हे संभाषण झाल्याचा दावा केला जातो. या प्रकरणावरुन राजकारण तापल्यानंतर राजपक्षे यांनी प्रथम ट्विटरवरुन हे दावे फेटाळून लावले. मन्नारमधील वीज प्रकल्पाच्या कंत्राटाबाबतीत कोणत्याही विशिष्ट व्यक्ती किंवा संस्थेला हा प्रकल्प देण्याचे प्रयत्न केल्याचा दावा स्पष्टपणे फेटाळून लावत आहे. मला विश्वास आहे की, या संदर्भात यापुढे अधिक जबाबदारीने संवाद साधला जाईल, असे राजपक्षे यांनी म्हटले आहे.
 

Web Title: lanka official claims pm modi wanted adani to get project but sri lankan president gotabaya rajapaksa denied

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.