एलएसडी ड्रग्जचा सर्वांत मोठा साठा जप्त; १० कोटींचा माल पकडला, ६ जण जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 09:26 AM2023-06-07T09:26:37+5:302023-06-07T09:27:10+5:30
गेल्या महिन्याच्या अखेरीस ही मोहीम राबविण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : अमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने (एनएसबी) मंगळवारी अमली पदार्थ एलएसडीचा आतापर्यंतचा सर्वांत मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत तब्बल एलएसडी १५ हजार ब्लॉट्स जप्त केले असून, त्यांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात १० कोटी आहे. डार्क नेटद्वारे कार्यरत ६ ड्रग्ज तस्करांना अटक करून मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. आजवर झालेल्या कारवाईत देशातील सर्वात मोठा साठा जप्त केल्याची माहिती एनसीबीचे उपमहासंचालक (उत्तर परिक्षेत्र) ज्ञानेश्वर सिंह यांनी दिली.
नाव गुप्त ठेवून कमवायचे होते पैसे
गेल्या महिन्याच्या अखेरीस ही मोहीम राबविण्यात आली. अटक झालेल्या विद्यार्थी व तरुणांना ‘विकर’सारख्या गुप्त इंटरनेट-आधारित ॲप्स व मेसेंजर सेवांचा वापर करीत मात्र ओळख लपवून सहज पैसे कमवायचे होते. हे तरुण २५ ते २८ वयोगटातील आहेत.