ड्रोनची सर्वात मोठी कार्यशक्ती महाराष्ट्रात; राज्यात सर्वाधिक ड्रोन पायलट प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 08:57 AM2023-07-24T08:57:34+5:302023-07-24T08:57:52+5:30

देशातील प्रशिक्षित ड्रोन पायलटची सर्वात मोठी कार्यशक्ती महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये आहे.

Largest drone workforce in Maharashtra; Highest drone pilot training in the state | ड्रोनची सर्वात मोठी कार्यशक्ती महाराष्ट्रात; राज्यात सर्वाधिक ड्रोन पायलट प्रशिक्षण

ड्रोनची सर्वात मोठी कार्यशक्ती महाराष्ट्रात; राज्यात सर्वाधिक ड्रोन पायलट प्रशिक्षण

googlenewsNext

हरिश गुप्ता 

नवी दिल्ली : देशातील प्रशिक्षित ड्रोन पायलटची सर्वात मोठी कार्यशक्ती महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये आहे. १ जुलै २०२३ पर्यंत महाराष्ट्रात ७४४ प्रशिक्षित ड्रोन पायलट होते आणि तामिळनाडूमध्ये १०८७ ड्रोन पायलट होते. परंतु, प्रशिक्षण केंद्रांच्या बाबतीत तामिळनाडूमधील चारच्या तुलनेत महाराष्ट्रात ११ केंद्र आहेत. 

देशात ६० प्रमाणित ड्रोन प्रशिक्षण केंद्र आहेत. गुजरातेत ६, हरयाणा १०, पंजाब १, नवी दिल्ली १ आणि प. बंगालमध्ये ही संख्या शून्य आहे. प. बंगालमध्ये ११० प्रशिक्षित ड्रोन पायलट आहेत. 
१३६५  टक्के वेगाने ड्रोन उद्योगाने एका वर्षात वाढ केली आहे. 

२८१  प्रशिक्षित ड्रोन पायलट उत्तर प्रदेश या सर्वात मोठ्या राज्यात.
५०७२ १ जुलै २०२३ रोजी वैमानिकांची संख्या.

देशात ड्रोनचा वापर झपाट्याने वाढला

देशात ड्रोनचा वापर झपाट्याने वाढत आहे. कारण सामान्य तसेच आपत्कालीन सेवांमध्ये अर्थव्यवस्थेच्या जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये या ड्रोनचा वापर होत आहे. 
ड्रोनच्या क्षेत्रनिहाय वापरामध्ये कृषी, लस वितरण, पाळत ठेवणे, शोध आणि बचाव, वाहतूक, मॅपिंग, संरक्षण आणि कायद्याची अंमलबजावणी यांचा समावेश आहे. 

अतिदुर्गम भाग, वैद्यकीय शस्त्रक्रिया आदींशी जोडण्यात ड्रोन यशस्वी ठरतात. ड्रोनचा वापर तस्कर, दहशतवादी आणि सीमेपलीकडील सैन्याकडून केला जातो, ही वेगळी बाब आहे. ड्रोन ट्रॅकिंग उपकरणेदेखील अंमलबजावणी संस्था वापरत आहेत.
 

Web Title: Largest drone workforce in Maharashtra; Highest drone pilot training in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.